April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष  अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. आजचा शुभ रंग – पिवळा.

वृषभ अनेक दिवसांपासून प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीत यश प्राप्त होईल. मुलांना यश प्राप्त होईल. बँकिंग, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. व्यापारात लाभ होईल. जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यात सुधारणा होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. आजचा शुभ रंग – पिवळा.

कर्क  तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. आजचा शुभ रंग – निळा.

सिंह जोडीदाराची साथ तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल. आज धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात यश आणि प्रगतीची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.

कन्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.

तूळ आज वाद-विवाद टाळा. भावूक होऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिसमधील कामात यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग – नारंगी.

वृश्चिक घरात लवकरच मंगल कार्ये होतील. आज दिवसभर धनप्राप्तीचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. महागड्या वस्तू जपून वापरा. आजचा शुभ रंग – लाल.

धनु खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम प्रसंगात थोडा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. धन प्राप्ती होऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारांमध्ये बढती होईल. व्यापार उत्तम राहील. आजचा शुभ रंग – निळा.

मकर मिळणाऱ्या यशामुळे मन प्रसन्न असेल. लव्ह लाईफमधील अडथळे दूर होतील. दाम्पत्य जीवनात आनंदी आनंद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

कुंभ  प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ आहे. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. तुमचं आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग – पांढरा.

मीन – अनेक योजना तुमच्या डोक्याला त्रासदायक ठरतील. प्रेमप्रकरणात काही तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे. प्रगतीच्या आड येणाऱ्या बाधा नष्ट होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click