November 26, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण फारसे अनुकूल नाही.थकवा, निरुत्साह जाणवेल. व्यय होईल. आर्थिक बाजू सांभाळा. प्रकृतीच्या तक्रारी असतील. दिवस मध्यम जाईल.

वृषभ दिवस लाभदायक असून मित्र मैत्रिणींसोबत मौज मजेचे प्लॅन आखले जातील .आर्थिक स्थिती उत्तम राहील. तृतीय स्थानात सूर्य बुध बंधुभाव वाढीस लागेल. प्रवास योग येतील. दिवस चांगला आहे.

मिथुन आज ऑफिस मध्ये तुमचा अधिकार वाढेल. काही उत्तम निर्णय घ्याल .काम जास्त असेल पण फळ मिळेल. आरोग्य ठीक राहील.आर्थिक बाजू ठीक. दिवस शुभ आहे.

कर्क भाग्य आज जोरात आहे. सूर्य गुरू नव पंचम योगात असून आध्यात्मिक प्रगती होईल. मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. देव धर्म कराल. खर्च बेताने करा. दिवस शुभ आहे.

सिंह आज राशीच्या अष्टमात होणारे चंद्र भ्रमण अनेक बाबतीत समस्या निर्माण करेल. वाहन जपुन चालवा. अपघात, प्रकृती सांभाळा. कोणाशी भांडण करू नका. विलासी वृत्ती वाढीस लागेल. दिवस मध्यम आहे.

कन्या आज तुम्ही दोघ एकमेकांना सांभाळून घ्याल. जोडीने घरासाठी खरेदी होईल. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी होतील. धार्मिक बाबतीत फारसे मन रमणार नाही. प्रकृती जपा. दिवस शुभ.

तुला आज षष्ठ चंद्र शारीरिक कष्ट दाखवत आहे.पैशाची देवाण घेवाण जपुन करा. नातेवाईकांना भेट द्याल. किंवा ते घरी येतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस मध्यम जाईल.

वृश्चिक आज संतती साठी काही निर्णय घ्याल. त्यांना वेळ द्याल. नोकरीत उत्तम संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळेल. दशमातील मंगळ शुभ संकेत देत आहे. दिवस उत्तम.

धनु आज धनु राशीच्या व्यक्ती साठी दिवस घरगुती काम, जबाबदारी वाढवणार आहे. अष्टमात सूर्य कार्य क्षेत्रात अडचणी दाखवतो आहे. कायदा पाळा. आरोग्य संभाळा. दिवस बरा आहे.

मकर आज मौज मजेचा दिवस आहे. महत्त्वाचे फोन, भेटीगाठी, प्रवास योग आहेत. राहू संतती संबंधी अडचणी निर्माण करेल. प्रकृती कडे लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. वाहन काळजीपूर्वक चालवा. दिवस चांगला आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना उत्तम आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. सहज बोलून थकबाकी वसुल होईल. जोडीदाराला नाराज करू नका .अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. दिवस कुटुंबातील व्यक्ती सोबत आनंदात घालवा.

मीन आज राशीतील चंद्र तुम्हाला मानसिक शांती, समाधान देईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. भावंडाची भेट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य ठीक. दिवस शुभ आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click