September 27, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

आज मंगळवार दिनांक 27 जुलै 2021 तिथी आषाढ कृष्ण चतुर्थी. अंगारक संकष्टी चतुर्थी . श्री गणरायाला वंदन करू या. दिवसभर चंद्राचे भ्रमण कुंभ राशीतून राहील. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष आज दिवस उच्च लाभ देणारा असून गुरू चंद्र शुभ योगाची फळे मिळतील. मन आनंदी राहील. पंचमातील मंगळ चंद्र संतती साठी शुभ. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. तुमचा नाव लौकिक वाढेल. शुभ दिवस.

वृषभ आज तुम्ही आपल्या कर्मभूमीत रमणार आहात. धाडसाने काही निर्णय घ्याल. तुमचे वरीष्ठ तारीफ करतील. आर्थिक बाजु ठीक राहील. प्रकृती पण चांगली राहील.घरातील व्यक्तींना वेळ द्या .दिवस शुभ आहे.

मिथुन भाग्य स्थानात गुरू चंद्र ,तुम्हाला खूप सुखद आणि दैवी अनुभव देणार आहेत.प्रवास, कार्य सिद्धीस जाईल. कर्क राशीतील सूर्य आणि कुंभ गुरू षडाष्टक योग करीत आहेत. प्रतिष्ठा जपा. अष्टम शनीची चिंता आज करू नका. दिवस शुभ आहे.

कर्क आज काही नवीन गूढ शास्त्राचे वाचन किंवा अभ्यास करा. धनस्थानातील मंगळ शुक्र व अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल. पण मन थोडे अस्वस्थ राहील. थकवा जाणवेल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रवास,मौजमजेसाठी खर्च कराल. दिवस मध्यम आहे. गुरु उपासना करावी.

सिंह तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येणारा दिवस आहे. त्यासाठी थोडा खर्च करायला हरकत नाही. कार्यक्षेत्रातील बदलफायद्याचे ठरतील. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. दिवस उत्तम आहे.

कन्या षष्ठ स्थानातील गुरू चंद्र प्रकृती उत्तम ठेवतील.आज नौकरी व्यवसाय आणि त्यासंबंधी काही बोलणी असतील तर यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. खरेदी होईल. दिवस चांगला जाईल.

तुला पंचम स्थानातील गुरू चंद्र अतिशय शुभ असुन वैचारिक बैठक मजबूत करतील. उत्तम ,लिखाण वाचन अभ्यास यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. मुले तुम्हाला आनंद देतील. शुभ दिवस..

वृश्चिक आज वृश्चिक राशीचे लोक घर म्हणजे स्वर्ग असा अनुभव घेतील. उत्तम सजावट ,घरात काही विशेष पुजा यात मन रमून ,जाईल.आर्थिक बाजु चांगली .आरोग्य ही साथ देईल. अनावश्यक खर्च टाळा. दिवस चांगला आहे.

धनु महत्त्वाचा फोन, नौकरी साठी मुलाखत, छोटासा सुखद प्रवास असा आजचा दिवस आहे.आर्थिक व्यवहार जपून करा. वाहन अगदी जपून चालवा. अष्टमात सूर्य प्रकृती कडे लक्ष द्या. दिवस शुभ आहे.

मकर आज काही दान, पुजा यासाठी खर्च होऊ शकतो. तुमच्या मनाचा कल अध्यात्मा कडे वळेल.वाणी मधुर, कुटुंबाशी संबंध उत्तम असतील. तुमचा आर्थिक फायदा होणार आहे. दिवस शुभ.

कुंभ राशीतील गज केसरी योगातील गुरू चंद्र मान प्रतिष्ठा वाढवणारे आहे. मन स्थिर ,आनंदी राहील मुलांबद्दल शुभ समाचार मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. शनि उपासना करावी. दिवस उत्तम आहे

मीन आज व्यय स्थानातील ग्रह फारसा लाभ मिळू देणार नाहीत. काही खर्च समोर उभे राहतील. मुलांसाठी काही खरेदी, कपडे, घ्यावे लागतील.राशी स्वामी गुरू चंद्रा सोबत असून दिवस मार्गी लावण्यास मदत करतील. गुरु जप करावा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *