मेष
आज घरांमधे अनेक महत्त्वा च्या घडामोडी होतील. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होऊन काम सुरळीत होईल. धार्मिक कार्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम यात सहभाग घ्याल. आज दिवस शुभ आहे.
वृषभ
आज दोन दिवस जाणवणारा निरुत्साह संपून नवीन उत्साह येईल. भाग्याचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. खरेदीचा आनंद घ्याल. दिवस चांगला जाईल.
मिथुन
अती दगदग अणि ताण यामुळे आज तुम्हाला प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
राशीतील बुध गुरूशी शुभ योग करीत आहे.बुद्धी आणि चातुर्य यामुळे भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम.
कर्क
राशीतील सूर्य सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करून देतील. काम पटापट होतील. बुद्धी चा उपयोग चांगल्या कामासाठी करा. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती साठी शुभ आहे. दिवस चांगला जाईल.
सिंह
आज षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण,दिवस थोडा संथ आणि कंटाळवाणा जाईल. मंगळ स्वभाव थोडा चिडचिडा करेल. आज जोडीदाराला वेळ द्यावा .त्यांची मदत घेऊन काही कामे पुढे जातील. दिवस शुभ.
कन्या – आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा आणि बोलाचालीत भागच घेऊ नका. प्रणयात सफलता मिळेल. प्रिय व्यक्तीशी मुलाखात होईल. कामूक राहाल.
तूळ – गणेशजी सांगतात की अतिशय संवेदनशीलता आणि विचारांचे अवडंबर यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता आणि स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. यात्रा प्रवासा साठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने यात्रा प्रवास टाळा.
वृश्चिक – श्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय आणि मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. भाग्यात लाभदायक बदल होतील.
धनु – आपला आजचा दिवस मध्यम फलदायी सिद्ध होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका.
मकर – श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नाम- स्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान सम्मान मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत.
कुंभ – आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक स्वास्थ्य राहणार नाही. कोर्ट- कचेरीतील कटकटीमध्ये पडू नका. अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होऊ नये याकडे लक्ष द्या. कुटुंबातील व्यक्ती विरोधात वागतील.
मीन – मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यावर खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र आणि वडीलधार्यांशी संपर्क होतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह-संबंध जुळतील आणि भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल.