October 2, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती लावाल.

वृषभ – हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. नवीन काम सुरू करायला वेळ योग्य नाही. यात्रा- प्रवासात विघ्ने येतील. 

मिथुन – श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल. पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी, पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल.

कर्क आज गुरूचरणी लीन होऊन दिवस प्रार्थना आणि पूजा या मध्ये जाईल. आज कोणाशीही वाद नको. आर्थिक घडामोडी, निर्णय पुढे जाऊ द्या. गुरुकृपा व्हावी म्हणून गुरु जप व दान करा. दिवस मध्यम आहे.

सिंह राशीतील मंगल शुक्र चैनी कडे कल ठेवतील खर्च आटोक्यात ठेवा. रागावर नियंत्रण राहू द्या. गुरु कृपा आहेच पण आज विशेष साधना करावी. आध्यात्मिक दिवस शुभ आहे.

कन्या आज दिवस दुसर्‍यांची सेवा करण्यात जाईल. घरात खूप काम निघेल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृती कडे लक्ष द्या मंगळ व्यय स्थानात असून खर्च वाढवेल. तुमच्या बुद्धीचा उपयोग कार्य क्षेत्रात होईल. शुभ फळ मिळेल.

तुला आज दिवस नामस्मरण करण्यात घालवा. पुढील दिवसाचे नियोजन करा. दशमातील सुर्य शनि प्रतियोग कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करेल. पण सध्या काहीही निर्णय घेऊ नका. वाद नको. दिवस चांगला जाईल.

विकासाची कावड अविरतपणे वाहू – धनंजय मुंडे !

वृश्चिक कुठूनतरी येणारा पैसा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्‍न करा. दशमातील मंगळ अचानक जोरदार संधी मिळवुन देणार आहे .लाभ होतील. मात्र विपरीत बुद्धी ,निर्णय नको .गुरु उपासना सुरू करावी.

धनु तुमची रास गुरूची आहे आज उपासनेत वेळ घालवा. पुढील साधनेसाठी अतिशय शुभ दिवस. बुध गुरू प्रतियोग लेखक, व्यावसायिक, ज्योतिषी यांना यशदायक आहे. गूढ अनुभव येतील. दिवस उत्तम.

मकर आज चंद्र उच्च आध्यात्मिक अनुभुती मिळवुन देईल. प्रयत्‍न पूर्वक गुरु उपासना करावी. अष्टमात मंगळ प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतो आहे. जोडीदाराची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम जाईल

कुंभ आज दिवस उच्च आध्यात्मिक अनुभव घेण्याचा आहे. तुम्ही प्रयत्‍न करा. गुरु राशीत असुन बुधा शी नव पंचम योग करीत आहे. नोकरीत उत्तम संधी, व्यवसाय भरभराटीचा असा हा दिवस शुभ फळ देईल

मीन गुरूची प्रिय रास, आणि या सात्विक राशीच्या व्यक्तींना दिवस बिझी जाईल. काम खूप वाढेल. पण त्याचे उत्तम फळ मिळेल. गुरु कृपा होण्यासाठी आज गुरूचे दान आणि जप करावा. दिवस शुभ आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click