November 28, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल. तिथुन तो राहू शी प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज आषाढी एकादशी निमित्त दिवस हरी चिंतनात घालवा. मन थोडे नाराज राहील काही शारीरिक त्रास ही संभवतात. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम आहे.

वृषभ

आज दिवस उत्तम असुन आर्थिक ,व्यावसायिक निर्णय अगदी योग्य ठरतील. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. भागिदारीसाठी उत्तम दिवस.

मिथुन

आज दिवस भर मानसिक ताणतणाव, हुरहुर आणि प्रकृती नरम गरम राहील.काहीतरी मन गुंतून राहील असे काम करा. दिवस मध्यम आहे.

कर्क

पंचमात चंद्र आज उत्तम फळ देण्यास तयार आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. भक्ती आणि हरी पाठ यात मन रमवा. दिवस संततीसाठी फारसा अनुकूल नाही. काळजी घ्या.

सिंह

आजचा दिवस घरात जास्तीची काम, अनावश्यक खर्च, असा आहे. व्यावसायिक निर्णय अगदी ठीक राहतील. संघर्षातून यश मिळेल. दिवस चांगला आहे.

कन्या

तृतीय चंद्र एकादशी निमित्त देव दर्शन, भेटी गाठी घडवून आणेल. महत्त्वाचे फोन येतील. आज दिवस आनंदात घालवा. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ आहे.

तुला

आजचा दिवस हा आर्थिक भरभराटीचा आहे. प्रभू भक्तीची परिभाषा शिकवणारा आहे .आज भजन पूजनात मन रमू द्या. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. दिवस शुभ.

वृश्चिक

आज तुमच्या हाताने होणारे काही धार्मिक काम तुम्हाला फार आनंद देईल. राशीतील चंद्र दिवसभर कशात तरी गुंतवून ठेवेल आर्थिक बाजु ठीक राहील. दिवस चांगला जाईल.

धनु

आज धार्मिक कामावर भरपूर खर्च होईल. प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. आर्थिक व्यय आणि शारीरिक शिथिलता असा दिवस शांततेत घालवा.

मकर

वृश्चिक चंद्र आज काहीतरी लाभ घडवून आणेल. ईश्वरचरणी मन रमेल. संतती संबंधी काही शुभ समाचार मिळतील.अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. दिवस शुभ आहे.

कुंभ

आज दशमातील नीच चंद्र कार्यक्षेत्रातील काही समस्या समोर आणेल त्याचे समाधान करण्यात दिवस जाईल. राशीतील गुरू सहकार्य करेल. दिवस बरा जाईल.

मीन

आज दिवस भाग्याचा असून ईश्वरी उपासना अतिशय शुभ फळ देईल .धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख आणि नातेवाईकांच्या भेटी होतील दिवस चांगला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *