May 28, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

आज दिनांक 17 जुलै 2021 शनिवार. तिथी आषाढ शुद्ध अष्टमी..चंद्र आज दुपारनंतर तुला राशीत भ्रमण करेल. आजचं महत्त्वाचं राश्यांतर म्हणजे सूर्याचा कर्क राशीत झालेला प्रवेश. तिथे तो साधारण एक महिना असेल. त्यानुसार पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा सूर्य घराविषयी शुभ घटना घडवून आणेल. बरेच दिवस रेंगाळणारी घराची कामे आता पटापट होतील. ऑफिस मध्ये तुमचा अधिकार वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. दुपारनंतर दिवस अनुकूलता वाढवणारा आहे.

वृषभ तृतीय स्थानात प्रवेश करणारा रवि पराक्रमाची वाढ करेल. स्वभाव तेजस्वी होईल. रवि मंगळ युती बोलण्यात तिखट पणा आणेल.

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कर्क: परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

सिंह: आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.

वृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

धनु: धनु राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

मकर: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.

कुंभ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

मीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click