मेष राशी – खर्चात वाढ होण्याची शक्यता. विचारपूर्वक निर्णय घ्या. भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व देणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरेल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग – गुलाबी. शुभ अंक –
वृषभ राशी – डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असेच वागणे मंगळवारी सोयीचे आहे. नियम आणि कायदे पाळणे तसेच वाद टाळणे फायद्याचे ठरेल. शुभ रंग – पांढरा. शुभ अंक – ६.
मिथुन राशी – दिवस मजेत जाईल. मनासारखे काम करण्याची संधी मिळेल. वाद टाळा. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. शुभ रंग – हिरवा. शुभ अंक – ५.
कर्क राशी – महत्त्वाचे निर्णय जाणकारांच्या सल्ल्याने घेणे हिताचे राहील. वाद टाळा. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. शुभ रंग – निळा. शुभ अंक – २.
सिंह राशी –महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हा दिवस नाही. वाद होणार नाही याची काळजी घ्या. नियम आणि कायद्याचे पालन करणे आपल्या सोयीचे आहे. शुभ रंग – केशरी किंवा भगवा. शुभ अंक – १.
कन्या राशी – कर्ज देणे वा जामीन राहणे किंवा वचनात अडकणे टाळा. संयमाने वागा. व्यवहाराला महत्त्व द्या. शुभ रंग – मोरपिशी. शुभ अंक – ५.
तूळ राशी –थोरांच्या सल्ल्याने वागणे सोयीचे आहे. नियम आणि कायद्याचे पालन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग – आकाशी निळा. शुभ अंक – ६.
वृश्चिक राशी – शब्द देऊ नका आणि दिला तर पाळणे विसरू नका. कृती विचारपूर्वक करा. पुढाकार घेतल्यानंतर मागे हटू नका. निर्णय एकदाच पण पूर्व विचारांती घ्या. शुभ रंग – केशरी किंवा भगवा. शुभ अंक – ९.
धनु राशी – तब्येत सांभाळा. व्यवहार टाळा. दिवस मजेत जाईल. विनाकारण त्रास होईल असे शब्द बोलू नका,शुभ रंग – पिवळा. शुभ अंक – ३.
मकर राशी –चुका टाळा. नियम आणि कायदे पाळा. इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतःच्या चुका टाळण्यावर भर द्या. प्रामाणिक प्रयत्न हिताचे आहेत. शुभ रंग – निळा. शुभ अंक – ८.
कुंभ राशी –विचारकरुन बोला तसेच विचार करुन वागा. घाई करणे टाळा. संयम महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा. तब्येत सांभाळा. शुभ रंग – राखाडी. शुभ अंक – ८.
मीन राशी –गोड बोलून स्वार्थ साधू पाहणाऱ्या लोकांपासून दूर राहणे हिताचे आहे. तब्येतीची काळजी घ्या. वेळेचे नियोजन करा. शुभ रंग – पिवळा. शुभ अंक – ३.