November 28, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आपली आत्मीयता अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भयाबरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे तम्ही बेचैन राहाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. महत्त्वपूर्ण व्यवहार आज न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. ऑफिस किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते.विद्यार्थ्यांसाठी मध्यम दिवस.

वृषभ

चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. हळवेपणा आणि काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला आणि साहित्य बाहेर यायला चांगला दिवस. कुटुंबीयांकडे चांगले लक्ष राहील. मित्राबरोबर प्रवास ठरवाल. आर्थिक गोष्टी पूर्ण होतील. आवडीचे भोजन मिळेल. भाग्यवृद्धी होईल असे श्रीगणेश सुचवितात.

मिथुन

श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला कामात सफलता मिळेल फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी धंद्यात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. परिवारातील वातावरण आनंदाचे राहील.

कर्क

शारीरिक व मानसिक सुख मिळेल. मित्र आणि स्वजन यांच्याबरोबर आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आपले मन अगदी संयमी राहील. दाम्पत्यजिवनात जीवनसाथी बरोबर विशेष आकर्षण वाटेल ज्यामुळे नात्यात मधुरता येईल. प्रवासाची शक्यता व आर्थिक लाभाचे योग आहेत.

सिंह

चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वादविवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट कचेरीच्या कामात सावधानीपूर्वक पाऊले टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या. वाणी आणि व्यवहार यात संयम आणि विवेक राखण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

कन्या

तन मनाच्या स्वस्थते बरोबर आजचा आनंदी दिवस तुम्हाला विविध लाभ मिळवून देईल. व्यापारी आणि नोकरी करणार्‍यांना आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ तुमच्यावर खूष राहिल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुका साठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक सिद्ध होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. वैवाहिक सुखाचा भरपूर आनंद मिळवाल असे श्रीगणेश सांगतात.

तुळ

श्रीगणेश कृपेने आज तुमची कामे सहजतेने पूर्ण होतील. मान- सन्मानात वाढ होईल. ऑफिसात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्‍यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल.

वृश्चिक

आळस, थकवा आणि चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीकडूनच तुम्हाला चिंता लागेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे तुम्हाला हताश बनवेल. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका असा श्रीगणेश सल्ला देतात.

धनू

अनैच्छिक घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण तंट्यापासून दूर राहा.

मकर

कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांबरोबर आनंदात आजचा दिवस व्यतीत कराल. भिन्न लिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान- सन्मान यात वृद्धी होईल. स्वास्थ्य चांगले राहील. प्रिय व्यक्तीबरोबर भेट आणि छोटा प्रवास आपल्या आनंदात भर घालतील, असे श्रीगणेश सांगतात.

कुंभ

श्रीगणेश म्हणतात की, आज आपल्याला कामात सफलता व यश मिळेल. कुटुंबातील सदस्याबरोबर अधिक स्नेहाचे प्रेमाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी धंद्यात सहकारी सहकार्य करतील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील.

मीन

श्रीगणेश सांगतात की तुमच्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून तुम्ही साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांच्या जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा आणि कामवृत्ती राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील. मानसिक संतुलन व बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *