March 25, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुंदर भोजन करणे तसेच आनंदात वेळ घालवणे याचा योग येईल. आर्थिक बाबतीत भविष्या साठी चांगले प्लेनिंग करू शकाल. लक्ष्मीदेवीच्या कृपेने मिळकतीत वाढ होईल. कलाकार, कारागिर यांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल आणि त्याची कदरही केली जाईल.नकारात्मक विचारापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

वृषभ

आजचा दिवस उत्साही आणि प्रसन्नतापूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. सगे-संबंधी किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजन दिवस आणखीच आनंदी बनवतील. आर्थिक फायदा संभवतो. श्रीगणेश म्हणतात की वैवाहिक जीवनातील उत्तम सुख आज तुम्हाला प्राप्त होईल.

मिथुन

श्रीगणेशजी म्हणतात की संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील. आपल्या बोलाचालीतून गैरसमज पैदा होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कुटुंबात दुःखीकष्टी वातावरण राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. आध्यात्मिक व्यवहार मानसिक शांती देऊ शकतात.

कर्क

अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे पाहता आजचा आपला दिवस अतिशय रोमांचक व आनंददायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. मिळकतीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. मुलगा व पत्नी यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन, तसेच विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह योग आहे. उत्तम भोजन व स्त्रीसुख मिळेल.

सिंह

श्रीगणेश म्हणतात की तुमच्या कामात उशीरा यश मिळेल. ऑफिस किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेणे हे टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. पित्याबरोबर मतभेद होतील. शुभ कामे ठरविण्यासाठी ही वेळ योग्य नाही.

कन्या

शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. ऑफिसात वरिष्ठांबरोबर आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यासाठी पैसा खर्च होईल. भाऊबंदाकडून लाभ होण्याची शक्यता श्रीगणेश सांगतात.

तुळ

स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार यामुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, आणि कामवृत्ती यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील. स्त्रीया तसेच जलाशय यापासून दूर राहणे हिताचे आहे असे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाल. आपण आनंदी राहाल. मिळकत वाढेल. अविवाहितासाठी विवाह योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण अनुभवाल.

धनू

श्रीगणेश सांगतात की, आर्थिक आणि व्यावापारिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कार्ये यशस्वी होतील. परोपकाराची भावना आज बलवत्तर राहील. आनंदात आजचा दिवस व्यतित होईल. नोकरी व्यवसायात उन्नती आणि मानसन्मान प्राप्त होईल. गृहस्थ जीवनात आनंदी आनंद असेल.

मकर

श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक कामे आणि व्यवसायात आज नवी विचार प्रणाली अमलात आणाल. लेखन आणि साहित्य क्षेत्रात तुमची सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा आणि ऊबग वाटेल. संततीच्या प्रश्नासंबंधी चिंता निर्माण होईल. उच्च पदस्थ तसेच प्रतिस्पर्धी यांच्याबरोबर चर्चेत भाग घेऊ नका, तेच हितकर होईल.

कुंभ

नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. ईश्वराचे नामस्मरण व अध्यात्मिक पठण मनाला शांती देतील असे श्रीगणेश सांगतात.

मीन

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी उत्तम वेळ आहे. पति-पत्नी मध्ये दाम्पत्यजीवनात निकटता येईल. मित्र, स्वजन यांच्या बरोबर भेटी होतील. रोमांस वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click