November 28, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल. त्यामध्ये गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल. गूढ आणि रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत. तरीही बोलण्यावर संयम ठेवा. त्यामुळेच अनर्थकारी संकटांपासून दूर राहाल. हितशत्रूंपासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.नवीन कार्यारंभ आज करू नका. अचानक धनलाभ होईल.

वृषभ

कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश आणि कीर्ती प्राप्त होईल. अचानक धनलाभाची पण आज शक्यता आहे.

मिथुन

कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची पण आज शक्यता आहे. महत्त्वाच्या विषयांवर खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. तरीही आपण वाणी आणि क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा मनाला ठेच लागेल. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील. त्याच बरोबर मान- सन्मान ही प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील.

कर्क

शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळा. शक्य असेल तर प्रवासही करू नका. अपचन, अजीर्ण असे विकार त्रास देतील. आज बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहा.

सिंह

आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा. आईशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक दृष्टीने नकारात्मकतेचा पगडा राहील. स्थायी संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता बाळगा. पाण्यापासून जपा. तब्बेतीकते आज विशेष लक् द्या.

कन्या

शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी असणारे संबंधात माधुर्य वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. गूढ आणि आध्यात्मिक विषयात सिद्धी प्राप्त होईल.

तुळ

द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यामुळे परिणाम सकारात्मक मिळतील. कुटुंबीयांशी वादविवाद टाळा. तब्बेतीकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक

आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.

धनू

उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. अपघातापासून जपा. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. तब्बेतही बिघडेल. शांतता मिळण्याच्या दृष्टीने ईश्वराची उपासना आणि आध्यात्मिकता उपयोगी पडेल.

मकर

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहोत्सुकांना इच्छित साथीदार लाभल्याने आनंद वाटेल. व्यापारातही दिवस लाभदायी ठरेल. सहली- प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल.

कुंभ

आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होतील. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. त्या कामातून लाभ होईल.

मीन

वरिष्ठ अधिकार्‍यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका आणि मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. हा प्रवास यशस्वी होईल. व्यापारीबंधूंना व्यापारत अडचणी येण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *