June 16, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेशाच्या सांगण्यानुसार आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल माहेर कडून लाभ होतील. आणि चांगल्या वार्ता मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता. मित्र आणि स्नेह्यांसमवेत आनंददायी प्रवासाचे योग आहेत. त्यांच्याकडून भेटवस्तू प्राप्त झाल्याने आनंद होईल.

वृषभ

आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही असे श्रीगणेश सांगतात. विविध चिंता सतावतील. तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील. त्यामुळे घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचे फळ असमाधानकारक असेल. त्यामुळे मनाला ग्लानी येईल. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन

आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट वाढेल असे श्रीगणेश वर्तवितात. पत्नी आणि मुलाकडून लाभदायी वार्ता मिळतील. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. विवाहोत्सुकांना योग्य साथीदार मिळेल. उत्तम भोजन सुख मिळेल.

कर्क

श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता. कुटुंबात महत्त्वाच्या विषायवर चर्चा होईल. आईची तब्बेत चांगली राहील. धन- संपत्ति, मान- सन्मानाचे अधिकारी बनाल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. दिवसभराच्या कामामुळे थकवा जाणवेल. तब्बेत चांगली राहील आणि गृहस्थजीवनात आनंद वाटेल.

सिंह

आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल आणि स्नेह्यांसोबत एखाद्या धर्मस्थळी जाण्याची सुवर्णसंधी लाभेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोध आवरा. व्यवसायात अडचणी येतील आणि वरिष्ठ नाराज झाल्याने तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे. तब्बेत साधारण राहील.

कन्या

वाणीवर ताबा ठेवण्याची सूचना देतानाच श्रीगणेश आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात. स्नेही आणि कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूपासून सावध राहा.

तुळ

आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. यात्रा सहलीचे योग आहेत. मनोरंजनाची साधने आणि वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. तन-मन स्वस्थ राहील. मान- सन्मान मिळू शकतात.

वृश्चिक

कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच छुपे शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. कचेरीत सहकार्य चांगले मिळेल. मैत्रिणींशी भेट आणि प्रणय प्रसंगामुळे आनंद द्विगुणीत होईल. आर्थिक लाभाचे संकेत मिळतील व अपूर्ण कामे पूर्ण होतीत. आजारी व्यक्तींना आराम पडेल.

धनू

आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. आज सहल-यात्रा करू नका असे श्रीगणेश सांगतात.

मकर

आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. घरातील सदस्यांशी कटू प्रसंग घडतील. त्यामुळे मनात बेचैनी वाढेल. वेळेवर भोजन आणि शांत झोप मिळणार नाही. पाणी आणि स्त्री वर्गापासून जपून राहा. त्यामुळे धनहानी होईल व अपयश येण्याचे योग आहेत.

कुंभ

चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल असे श्रीगणेश सांगतात. मनात उत्साह संचारेल. त्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे आणि स्नेही यांच्याशी विचार जुळतील. महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत आखाल.

मीन

वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील असा इशारा श्रीगणेश देत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानी बाळगा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ढासळेल. कुटुंबीयांकडून मतभेदाचे प्रसंग घडतील. खाण्यापिण्यावरही संयम ठेवा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *