January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. देणे-घेणे करताना काळजीपूर्वक करा. अध्यात्माकडे कल राहील. लोभाच्या लालसेपासून दूर राहा. निर्णयशक्तिच्या अभावाने द्विधा मन होईल.

वृषभ

श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि आवक वाढणे यावर लक्ष्मीची कृपा राहील. कुटुंबीय व मित्र यांच्याबरोबर आनंदी वातावरण राहील. नवे संबंध व नवे परिचय व्यापारत लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आजचा संपूर्ण दिवस उल्हास व प्रसन्नतेने भरलेला जाईल.

मिथुन

शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयां बरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यवसाय धंद्यात पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामेही सहजतेने पूर्ण होतील.

कर्क

भाग्यात वृद्धी करणारा आजचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशातून शुभ समाचार मिळतील. धार्मिक यात्रा किंवा छोटा प्रवास यामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्याचा दिवस. मन प्रसन्न राहील. मित्र, कुटुंबीय यांच्या बरोबर दिवस आनंदात जाईल. व्यवसाय धंद्यात फायदा होईल. अचानक धन मिळण्याचे योग प्रबळ आहेत. परदेशगमन व धार्मिक कार्य यात सफलता मिळेल.

सिंह

आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आज घरचेच खाणे पीणे ठेवा. ते अधिक फायदेशीर होईल. नकारात्मक विचार मनात राहतील, ते दूर करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. ध्यान, जप, आध्यात्मिकता आज तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. त्यामुळे मनाची अस्वस्थता कमी होईल.

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार धंद्यात भागीदारा बरोबरचे संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे खरेदी केल्याने खुशीत असाल. मित्रांबरोबर प्रवासाचा आनंद लुटाल.

तुळ

श्रीगणेश सांगतात की आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. परिवारासोबत वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. खर्च वाढणार नाही याकडेही लक्ष द्या. कामात सफलता व यश प्राप्त होईल.

वृश्चिक

वाद विवादात अडकू नका असे श्रीगणेश सांगतात. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा यात धन खर्चू नका असा श्रीगणेश सल्ला देतात. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करायला उचित वेळ आहे. केलेल्या कष्टानुसार सफलता सुद्धा मिळेल.

धनू

आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना जपून करावेत. धनहानीचा योग आहे. मानहानी होणार नाही याकडे लक्ष द्या. मातेच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील. छातीचे दुखणे त्रास देऊ शकते.

मकर

मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल दिवस. विद्यार्थ्यांनाही अनुकूलताच असेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. स्वास्थ्य टिकून राहील. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता.

कुंभ

मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. निरर्थक खर्च होऊ देऊ नका. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही. कामे यशस्वी होण्यास उशीर लागेल.

मीन

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्याबरोबर प्रवासास जाणे होऊ शकते. धनप्राप्तीचे योग आहेत. धार्मिक प्रवास व धार्मिक कार्ये यांचे आज योग आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click