March 22, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी- सजावट याचा विचार कराल. कामात समाधान वाटेल. स्त्रियांकडून सन्मान मिळेल. आईशी सुसंवाद साधाल. निरुत्साह सोडून द्या.

वृषभ

परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात.परदेशी जाण्यास इच्छुक असणार्‍यांना चांगली संधी आहे. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एक दोन धार्मिक स्थळाच्या यात्रेमुळे मन आनंदी बनेल. नोकरी-व्यवसायात कामाचा भार वाढेल. तरीही आर्थिक लाभाची शक्यता आहे.

मिथुन

निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नका. रागावम संयम ठेवला नाही तर अनिष्ट प्रसंग उद्भवतील. खर्च जास्त होईल. पैशाची चणचण भासेल. निषेधार्ह विचारांपासून दूर राहा. आध्यात्मिकता व ईश्वराची प्रार्थना यातून मार्ग मिळू शकेल.

कर्क

समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. तब्बेत चांगली राहील. मान- प्रतिष्ठा वाढेल. यात्रा व प्रवासाचे बेत आखाल.

सिंह

श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना वाणीवर संयम ठेवा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. अधिक कष्ट करूनही प्राप्ती कमी मिळाल्याने निराशेचा सूर राहील. आई विषयक चिंता राहील.

कन्या

आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढतील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तींची भेट होईल. त्यांच्याशी संवाद झाल्याने मन आनंदित राहील. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करणार्‍यांनी सावध राहावे.

तुळ

आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. मनात संवेदनशीलता जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव असेल. मानसिक तणाव पण असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. जवळच्या नातलगांबरोबर संघर्ष किंवा वाद झाल्याने मनाला यातना होण्याचे प्रसंग येतील.

वृश्चिक

नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल. आर्थिक लाभाचे आणि भाग्योदयाचे योग आहेत. छोटया प्रवासाचे बेत आखाल. मित्रांच्या भेटीमुळे मन आनंदित राहील. कामात यश मिळेल.

धनू

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होणार नाहीत. याविषयी दक्ष राहा. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल अकारण खर्च वाढतील.

मकर

सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. व्यापार धंदयात तुमचा प्रभाव राहील. तुमच्या कार्यावर अधिकारी वर्ग खूष राहील. कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा तुम्ही फायदा करून ध्या असे श्रीगणेश सांगतात. मन शांत राहील. शारीरिक कष्टांपासून दूरच राहा.

कुंभ

आज मन आणिशरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. कार्टाच्या कामातही सांभाळूनच. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. वाणी आणि राग यावर संयम ठेवा. अपघाताचे योग आहेत.

मीन

आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ. एखाद्या रमणीय स्थळाला भेट द्याल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click