September 20, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज श्रीगणेशाचा आशीर्वाद लाभल्याने दिवसभर मानसिक दृष्ट्या समाधान वाटेल. कौटुंबिक जीवन सुखी राहील. त्याच बरोबर सुखमय प्रवास आणि रूचकर भोजन मिळण्याचा योग आहे. हरवलेली एखादी वस्तू सापडेल. तरीही आपले विचार आणि अतिउत्साहाला आवर घाला. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश आणि लाभ मिळेल. श्रीगणेश सल्ला देतात की बौद्धिक चर्चा करताना वादविवाद टाळून समाधानकारी व्यवहार स्वीकारा.

वृषभ

आज दिवसभर मनात आनंदाची छटा उमटेल. कामात व्यवस्थितपणे आघाडीवर राहाल आणि योजनेनुसार कार्यपूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील. माहेरहून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्ट्या आनंदात राहाल. तब्बेत चांगली राहील.

मिथुन

आजचा दिवस मध्यम राहील. नवे काम हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटेल. त्यामुळे मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने तब्बेत नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळा. त्यामुळे कोणाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. अपमान वा मानभंगापासून स्वतःला जपा.

कर्क

आज सांभाळून राहा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी आज कष्ट घ्यावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांमुळे त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने पण मन दुःखी होईल. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक दृष्ट्या अपमानाचे प्रसंग उदभवणार नाहीत याची दक्षता घ्या. निद्रानाशाचा त्रास होईल.

सिंह

कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात यांमुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र आणि स्नेही यांच्या समवेत एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या- फिरण्याचा आनंद घ्याल. तब्बेतही एकदम चांगली राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. भाग्योदयाचे संकेत आहेत. नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे.

कन्या

आजचा दिवस आपणासाठी शुभ राहील असे श्रीगणेश सांगतात. मधुर वाणी इतरांच्या मनावर सकारात्मक छाप पाडेल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल.

तुळ

आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास झळकेल असा श्रीगणेशाच्या आशीर्वाद आहे. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास यासाठी खर्च होईल. खंबीर विचार वाढतील. रचनात्मक कार्यात मन रमेल.

वृश्चिक

श्रीगणेश म्हणतात की आज तुमचा हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्यासंबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. दुर्घटनेपासून जपा. कुटुंबीय किंवा सगे- सोयरे यांच्याशी गैरसमज होईल किंवा पटणार नाही. कोर्ट कचेरीच्या कामात सावधगिरी बाळगा. प्रत्येकच विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.

धनू

आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. श्रीगणेश कृपेने मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल. आवडत्या व्यक्तीबरोबर सुखद क्षण अनुभवाल. मित्रांबरोबर पर्यटन स्थळाला भेट द्याल. अविवाहितांसाठी विवाहयोग येतील. पत्नी किंवा मुलगा यांच्याकडून लाभ संभवतो.

मकर

व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढतील. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास यातून फायदा संभवतो. वरिष्ठ तुमच्यावर खूश असल्याने पदोन्नतीचे योग आहेत. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. गृहस्थ जीवन आनंदी असेल. संततीची प्रगती पाहून संतुष्ट व्हाल.

कुंभ

श्रीगणेश म्हणतात की शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठापासून संभाळून राहावे लागेल. मौज-मजा तसेच सहली यासाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यां बरोबर चर्चेत भाग घेऊ नका. परदेशातून वार्ता समजतील.

मीन

श्रीगणेशांना आज तुमचा अचानक धन लाभाचा योग दिसतो आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. पाण्यापासून दूर राहा. इस्टेटीतून फायदा होईल. अनैतिक कामवृत्तीवर ताबा ठेवा. ईश्वरभक्ती व आध्यात्मिक विचार तुमचे कष्ट कमी करतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *