March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल दिवस आहे. श्रीगणेश सांगतात की आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर दिवस आहे. शारीरिक आणि मानसिक उत्साह आज अनुभवाल. मित्र- स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्याबरोबर आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्याबरोबर एखादा समारंभ किंवा सहलीस जाण्याचा योग आहे. सद्भावनेने केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल.

वृषभ

आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन तुम्हाला फायदा देईल तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभकार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन- लेखन या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरीही तुमची कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतील. प्रिय व्यक्तीशी भेट होऊ शकते. पोटाच्या तक्रारीने त्रस्त राहाल.

मिथुन

द्विधा अवस्थेतील आपले मन महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा तुमच्या दृढतेला कमजोर करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.

कर्क

शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र- स्नेहीजन यांच्या भेटी होतील. मित्रांकडून लाभ होईल. शुभ कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ आणि भाग्यवृद्धी होऊ शकते. लहान सहलीस जाल. मान सन्मान वाढेल.

सिंह

कुटुंबियासमवेत सुख शांती मध्ये दिवस घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्रीमित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. मिळकतीपेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. ठरलेल्या कामात यश जरा कमीच मिळेल असे श्रीगणेश सांगतात.

कन्या

श्रीगणेश सांगतात की आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य आणि मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इ. प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास आणि सहली-प्रवास याने आपला दिवस आनंदात जाईल.

तुळ

आज थोडा सुद्धा असंयम व अनैतिक व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल. दुर्घटनेपासून सावध राहा. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. कामेच्छा प्रबळ राहील. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी अध्यात्मिकतेचा उपयोग होईल.

वृश्चिक

नोकरी धंद्यात व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. पुत्र किंवा पत्नीकडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. उच्चपदस्थांची कृपादृष्टी राहील. सांसारीक जीवनात आनंद उपभोगाल असे श्रीगणेश सांगतात.

धनू

शुभफलदायक दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थी जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता आणि वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल.

मकर

अनुकूलता प्रतिकूलता असा संमिश्र फलदायक दिवस राहील. बौद्धिक कार्य आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संततीविषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. दामाचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. छोटासा प्रवास आनंददायक ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वादविवाद करू नये.

कुंभ

अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती आणि वस्तू याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने धन संकट येईल. क्रोधावर संयम ठेवा. आर्थिक चणचण भासेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया अस्वास्थ्य राहील.

मीन

दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या- फिरण्याला जाणे आणि मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. शारीरिक आमि मानसिकदृष्ट्या आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. आपली प्रतिष्ठा वाढेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click