August 9, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज प्रत्येक पाऊल जपून उचलण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल. निद्रानाश झाल्यामुळे तब्बेत बिघडेल. बौद्धिक चर्चेमुळे आनंद मिळू शकतो. पण अशा चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ

श्रीगणेश सांगतात की आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभाची शक्यता. परंतु दुपारनंतर स्थिती एकदम विचित्र होईल. खर्च वाढेल आणि कामात अपयश येण्याचे योग आहेत.

मिथुन

नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला असे श्रीगणेश सांगत आहेत. असंतोषाची भावना मनात वाढेल. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचे धाडस करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वकीयांच्या गाठीभेटीमुळे मन आनंदी राहील. आजचा प्रवासही आनंददायक ठरेल.

कर्क

भावनेच्या भरात वाहून जाऊ नका अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपारनंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन राहील. अनैतिक प्रवृत्तीमुळे मन भ्रष्ट होऊ नये याकडे लक्ष द्या. पैसा जास्त खर्च होईल.

सिंह

कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सुचवितात. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. गैरसमज दूर करा. संबंधीतांशी मतभेदाचे प्रसंग. दुपारनंतर मात्र मित्र- स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.

कन्या

आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपारनंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. बोलण्यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोर्ट-कचेरी प्रकरणात निर्णय घेताना सावध राहा. धनहानी बरोबरच मानहानी होऊ नये म्हणून जपून राहा.

तुळ

आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल, असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्चाधिकार्यांकडून व्यवसायात आर्थिक लाभ होईल. आर्थिक नियोजन निष्ठापूर्वक कराल. तब्बेत चांगली राहील. मानसिक शांततेचा अनुभव घ्याल. संततीकडून सुख मिळेल.

वृश्चिक

आज भाग्योदयाचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या वार्ता येतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक हेतूने प्रवासाची शक्यता. धनलाभाची पण शक्यता. व्यवसायात बढतीचा योग आहे. आपले प्रत्येक काम यशस्वी आणि पूर्ण होईल. आईशी जवळीक वाढेल. मानसन्मान प्राप्त होतील. गृहस्थजीवन आनंदपूर्ण राहील.

धनू

आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल असे श्रीगणेश सांगतात. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम साधतील. सबब वैचारिक स्तरावर संयम राखणे आवश्यक. आर्थिक तंगी जाणवेल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्रफुल्लित होईल. अचानक धन प्राप्ती होईल. व्यवसायात लाभ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. व्यवसायात लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या समवेत वेळ आनंदात जाईल. प्रवासाचे योग आहेत.

मकर

आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. अनैतिक कार्याशी संबंधित वृत्तीवर अंकुश ठेवा.

कुंभ

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आनंदात राहाल आणि वाहनसुख मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात कीर्ती मिळेल. वस्त्र प्रावरण आणि अलंकार यासाठी पैसा खर्च होईल. छोटासा प्रवास- सहल घडेल.

मीन

आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. नवीन कार्य हाती घेऊ नका. दुपारनंतर स्थिती एकदम पालटेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वास्थ्य मिळाल्याचे समाधान वाटेल. व्यावसायिकांना कार्यालयात अनुकूल वातावरण. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click