November 26, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार, व्यावसायात लाभ होतील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. आपल्या विचारांत एकदम बदल होतील. दुपारनंतर मात्र मनाचा खंबीरपणा कमी होऊन मन विचारात गढून जाईल. मानसिक शैथिल्य जाणवेल. द्रवपदार्थांपासून दूर राहा.

वृषभ

आजचा दिवस आपणाला मध्यम फलप्राप्तीचा जाईल.श्रीगणेश सांगतात की मित्र आणि स्नेह्यांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. श्रीगणेशांना वाटते की आज दिवसातील जास्तीत जास्त वेळ अर्थविषयक योजना आखण्यात खर्च कराल.

मिथुन

आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायी राहील असे श्रीगणेश सांगतात. आज आप्तेष्टांचे सहकार्य आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ मिळेल. मनात कोणत्याही प्रकारचे निषेधार्ह विचार आणू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यापार- व्यवसायात वातावरण अनुकूल असल्याने मन प्रसन्न राहील. दिवसभर मनात उत्साह आणि चैतन्य दखळेल.

कर्क

आर्थिक दृष्टीने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. डोळ्याचे विकार बळावतील. मानसिक चिंता राहील. उक्ती व कृतीवर संयम ठेवा. कोणाशी वाद होऊ नयेत याची काळजी घ्या. दुपारनंतर ग्रहमान पालटेल. आर्थिक दृष्टीने लाभदायी दिवस. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

सिंह

सकाळची वेळ फारच चांगली जाईल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक वार्ता प्राप्त होतील. मित्रांकडून शुभवार्ता. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल. दुपारनंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या. अपघाताची शक्यता. मानसिक चिंता राहील. कुटुंबीय व संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. तब्बेत बिघडेल.

कन्या

आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींशी प्रेमपूर्ण संबंध राहतील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. व्यवसाय- धंदयात वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश राहतील. त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. दुपारनंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळे काही समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या. अपघाताची शक्यता. जवळपासच्या एखाद्या रमय स्थळाला भेट द्याल. विवाहोत्सुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. मित्रांकडून लाभ होतील.

तुळ


सकाळच्या प्रहरी मन चिंताग्रस्त राहील. शारीरिक दृष्ट्या ढिलेपणा आणि आळस वाढेल. व्यवसायात वरिष्ठ असंतुष्ट राहतील. संततीशी मतभेदाची शक्यता. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. अधिकारी वर्गाची कृपादृष्टी आपणास लाभ देईल व बढती मिळू शकेल. सामाजिक क्षेत्रातही मान- सन्मानाचे प्रसंग येतील. तब्बेत चांगली राहील असे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक

अध्यात्म आणि ईश्वर प्रार्थना यांमुळे अयोग्य बाबींपासून आपली सुटका होईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर संयम ठेवला तर परिस्थिती अनुकूल बनू शकेल. पोटदुखीच्या विकाराने त्रस्त व्हाल. व्यावसायिक क्षेत्रात संकट येईल. वरिष्ठ अधिकार्यांपासून जपून राहा. व्यवसायात- धंदयात प्रतिकूल परिस्थिती जाणवेल.

धनू

दिवसभर मनात सुखदुःखाची संमिश्र भावना राहील असे श्रीगणेश सांगतात. सकाळी आनंद आणि मनोरंजना मध्ये गुंग राहाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांच्या भावनांचे ओझे वाढेल. त्यामुळे मन दुःखी होईल. रागाचे प्रमाण वाढेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकारी यांच्याशी वादविवाद करू नका. आध्यात्म आपणाला शांती मिळवून देईल असे श्रीगणेश सांगतात.

मकर

इतरांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. घरातील वातावरण सुख, शांती आणि आनंदपूर्ण राहील. मान- सन्मान मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतरचा काळ स्वकीय आणि मित्र यांच्या बरोबर दक्ष राहून घालवा. वाहनसुख मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मनोरंजन केंद्रावर जाऊन मन आनंदी बनविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल.

कुंभ

श्रीगणेश सांगतात की आज आपणाला कलेविषयी विशेष गोडी वाटेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होईल. धंदा-व्यवसायात सहकार्यांचे सहकार्य लाभेल. वाणीवर नियंत्रण ठेवा.

मीन

आज जास्त भावनाशील बनू नका असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अधिक विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा न करण्याचा सल्ली श्रीगणेश देतात. अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. सहल, प्रवास यासाठी काळ अनुकूल नसल्याने शक्यतो प्रवास टाळावेत. मानभंग होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click