September 20, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश म्हणतात की, विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी चांगला दिवस आहे. महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

वृषभ

मनाची द्विधा अवस्था ठोस निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्षात पडण्याचा संभव आहे. लेखक, कारागिर, कलाकार यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वाकचातुर्य आज तुमचे काम यशस्वी करेल व दुसर्‍याला मोहून टाकेल. नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी दिवस चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात.

मिथुन

आजचा दिवस लाभदायक जाईल अशी आशा करू शकता. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र नातलग यांच्याबरोबर उत्तम जेवणाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ मिळेल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल, असे श्रीगणेश सांगतात. सगळ्यांबरोबर मिळून आनंददायक प्रवास ठरवण्याचीही शक्यता आहे. दाम्पत्यजीवनात सुसंवाद असेल.

कर्क

शरीर आणि मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा निर्णय घ्यायला अतिशय कठिण करून सोडेल. कुटुंबीया बरोबर मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची चिंता लागून राहील. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

सिंह

श्रीगणेश म्हणतात की आज आपल्याला विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गहाळ राहिलात तर लाभापासून वंचित राहाल, तिकडे लक्ष द्या. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव आहे. पित्याकडून लाभ होईल. परिवारात आनंदाचे वातावरण राहील.

कन्या

नवीन काम सुरू करायला निर्मित योजना अमलात आणायला आज उत्तम दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात ताळ- मेळ असेल. सरकारी कामेपूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.

तुळ

दूरचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट द्याल. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरीही संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. नोकरी करणार्‍यांना वरिष्ठ किंवा सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी यांच्याबरोबर सखोल चर्चा करू नका असा श्रीगणेश सल्ला देतात. पैसा खर्च होईल.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस सावधानीपूर्वक व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहण्याचा व नवीन संबंध विकसित करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. दुर्घटनेपासून दूर राहा. इष्टदेवाचे नामस्मरण मनाला शांती देईल.

धनू

बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य या साठी शुभ दिवस आहे. मनोरंजन, प्रवास, मित्राबरोबर भेटी, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्न लिंगीया बरोबर जवळीक या गोष्टी आजचा दिवस आनंदित बनवतील. भागीदारीत फायदा होईल. जीवनसाथी बरोबरचे संबंध धनिष्ठ बनतील. सार्वजनिक मान- सन्मान वाढेल.

मकर

श्रीगणेशांच्या कृपेने व्यापार धंद्यात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मातृघराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहा, असा सल्ला श्रीगणेश देतात.

कुंभ

आज तुम्ही संतती व स्वतःचे स्वास्थ्य या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. प्रवासात अडचणी येतील. म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावेत असा सल्ला श्रीगणेश देतात.

मीन

शारीरिक व मानसिक भय वाटेल. कुटुंबियांबरोबर वाद-विवाद होईल. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे तुमचा उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन आणि कीर्ती यांची हानी होईल. स्त्रीवर्ग तसेच वाणी यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. स्थावर मिळकत, वाहन इ. च्या समस्या होऊन चिंता वाढेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *