March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश आज आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्दयांवर जागरूक राहायला सुचवतात. वादविवादापासून दूर राहा अन्यथा कुटुंबातील सदस्या बरोबर भांडणे होतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य खराब होईल. वेळेवर जेवणसुद्धा मिळणार नाही. व्यर्थ खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणाचा दृष्टीकोन ठेवा तेच फायदेशीर राहील.श्रीगणेश सांगतात आजचा दिवस तुम्हाला सामान्य दिवस आहे.

वृषभ

श्रीगणेश कृपेने आपला आजचा दिवस फायद्याने भरलेला जाईल. शरीर व मनाने आज तुम्ही स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभही होऊ शकतो. कुटुंबा बरोबर आनंदात वेळ घालवाल. नवे कपडे, दागिने आज खरेदी कराल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.

मिथुन

आज आपण आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावधान राहा असे श्रीगणेश सांगतात. आपल्या बोलाचालीत काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून सावध राहा. ईश्वरभक्ती आणि अध्यात्म यानेच मनाला शांती मिळेल.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल. नोकरी धंद्यात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांबरोबर प्रवासाला जाऊ शकता. प्रिय व्यक्तींबरोबर चांगला वेळ घालवाल. आर्थिक योजना यशस्वी कराल. विवाहोत्सुकासाठी विवाहयोग आहे. शरीर व मन स्वस्थ राहील.

सिंह


आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल याच्या मदतीने सगळी कामे यशस्वी कराल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय धंदयात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नतीचे योग येऊ शकतात. वरिष्ठांना तुमच्या कामाने प्रभावित कराल. पित्याच्या बाजूने फायदा होऊ शकतो. वाहन आणि संपत्ती या संबंधी कामे सहज पूर्ण होतील. सरकारी कामात ही यश मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल.

कन्या

श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकांच्या वार्ता समजतील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक सहली यासाठी खर्च होईल. बहीण- भावाकडून फायदा होण्याची शक्यता. परदेशात जाऊ इच्छिणार्‍यांना परदेशात जायला अनुकूल काळ आहे.

तुळ

कोणत्याही नवीन कामाचा आज आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. हितशत्रूपासून सावधान. तब्येतीची चांगली काळजी घ्या. गूढ विद्येकडे आकर्षण वाढेल. सिद्धी- साधना साठी आजचा दिवस चांगला आहे. खूप प्रयत्नांनी मानसिक शांती प्राप्त होईल.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आज आपण सगळा दिवस आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ मिळवाल. मित्राबरोबर कुठे तरी प्रवासास जाल. उत्तम जेवण मिळेल व नवीन आभूषणे मिळतील ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. व्यापार- भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. भिन्न लिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाटेल. पत्नी बरोबर आनंदात वेळ घालवाल.

धनू

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभ जाईल. स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती, आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबिया समवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखलच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांशी मुलाकात होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा संभव आहे.

मकर

आज आपण मनाने खूप अशांत व असमंजसपणाने राहाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही, त्यामुळे तणावात राहाल. श्रीगणेश सल्ला देतात की कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. नशीब आज तुमच्याबरोबर नाही, त्यामुळे तुम्ही निराश असाल. संतती विषयी चिंतीत असाल. घरातील थोरांची तब्बेत खराब होऊ शकते. शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. प्रतिस्पर्ध्यांबरोबर वादविवाद टाळा. पोटाचे दुखणे डोके वर काढील.

कुंभ

श्रीगणेश म्हणतात की अधिक संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन आणि अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. स्थावर- संपत्ती किंवा वाहन यांचे कागदपत्र बनवताना सावधानी बाळगा. सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी महिलांचा खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

मीन

श्रीगणेश म्हणतात की महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज शुभ दिवस आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. मित्र, परिवारासोबत प्रवासाला जाल. भावाबहिणी कडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान- सन्मान मिळेल. आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click