February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेण्याचा उत्साह राहील. पण अतिउत्साहाच्या भरात नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे पण लक्ष द्या. धन प्राप्तीचा योग श्रीगणेश सांगतात.

वृषभ 

शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल.काळजीमुळे मनावर ताण राहील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. कुटुंबीयांशी पण मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. त्यामुळे घरातील वातावरण बिघडेल. कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. त्यामुळे आर्थिक चिंता घेरतील. पूर्ण विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नये असा सल्ला श्रीगणेश देतात.

मिथुन

श्रीगणेश सांगतात की व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहोत्सुकांना योग्य जीवनसाथी मिळण्याचा योग संभवतो. कुटुंबात पत्नी आणि मुलाकडून चांगल्या वार्ता मिळतील.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. परिवारात सलोख्याचे वातावरण राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आईकडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. धन व प्रसिद्धी वाढेल.

सिंह

आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. संकटवर्धक विचार, वर्तन आणि नियोजन यांपासून दूर राहा. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या

खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा श्रीगणेशाचा सल्ला आहे. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. बोलण्यावर ही संयम ठेवा. अनैतिक कामांपासून अलिप्त राहा. धार्मिक यात्रा तथा प्रवासाची शक्यता. सरकार विरोधी कामांमुळे समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ

आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसमवेत बाहेर जावे लागेल. छोटया प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता आणि यश कीर्तीचे योग संभवतात. अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्चिक

सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल.शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरदारांना सहकारी सहकार्य करतील. माहेरहून चांगल्या वार्ता समजतील. धनलाभ होईल. अपूर्ण कामे तडीस जातील.

धनू

श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती स्वास्थ्य राहील. संतती विषयक चिंता राहील. त्यामुळे मन बेचैन राहील. प्रवास शक्यतो टाळवा.

मकर

प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी तंटा बखेडा किंवा निरर्थक चर्चेचे प्रसंग येतील. त्यामुळे मन व्यथित राहील. अपकीर्ती होईल. अपयशी व्हाल. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्य बिघडेल.

कुंभ

आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. तब्बेत पण चांगली राहील. परिवारात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. छोटे प्रवास घडतील.

मीन

मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. कोणाशी वादविवाद किंवा तंटा बखेडा टाळण्याचा प्रयत्न करा. खाण्या पिण्यावर संयम ठेवा. तब्बेत नरमच राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click