January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आपले एखादे काम किंवा प्रकल्पास सरकारकडून लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्दया संबंधी उच्च अधिकार्‍यांसमवेत विचार- विनिमय होईल. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. पारिवारिक गोष्टींत मनापासून रस घेऊन सदस्यां समवेत सल्ला- मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल.आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.

वृषभ

विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. तीर्थ यात्रांना भेटी द्याल. आध्यात्मिक प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात.

मिथुन

श्रीगणेश सावधानतेचा इशारा देताना सांगतात की संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी, शस्त्रक्रिया आज करू नका. मितभाषा राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेत बिघडेल. मानसिक दृष्ट्या निराश राहाल. मंत्र- जप, पूजा- भक्ती मनाला शांतता बहाल करेल.

कर्क

संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त मन आज भिन्न लिंगीय व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज- मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इ. खरेदी होईल. दांपत्यजीवन चांगले राहील. व्यापार्‍यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल. भागीदारी फायदेशीर ठरेल. प्रेमिकांना प्रणयात सफलता मिळेल. श्रीगणेशाचा आपणावर वरदहस्त आहे.

सिंह

श्रीगणेश सांगतात की उदासीनता आणि शाशक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ बनवेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. मातुल घराण्याकडून काळजी वाटणार्‍या बातम्या येतील. शत्रूला तोंड द्यावे लागेल. वरिष्ठ अधिकार्‍याशी संघर्ष टाळा असा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

कन्या

आजचा दिवस चिंता आणि उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे तब्बेत बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च उद्भवतील. बौद्धिक चर्चा आणि समझोता यात असफल व्हाल. प्रिय व्यक्ती भेटतील. कामुकता वाढून भिन्न लिंगीय व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा यापासून दूर राहा असे श्रीगणेश सांगतात.

तुळ

आज सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. विचारातील सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज यात्रा- प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन आणि पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितकारक ठरेल.

वृश्चिक

कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग असल्याचे श्रीगणेश सांगतात. भावंडांशी कौटुंबिक चर्चा आणि नियोजन होईल. तन- मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडे येणे होईल. त्यामुळे आनंदी राहाल. अध्यात्म आणि गूढ विद्यांचा अभ्यास यात रस घ्याल. जवळपासचा प्रवास होईल.

धनू

सावधानतेचा इशारा देताना श्रीगणेश सांगतात की कुटुंबातील व्यक्तींशी होणार्‍या गैरसमजा पासून बचाव करा. नाहक खर्च होईल. मानसिक उलघाल आणि द्विधा स्थिती यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दूरसंचार माध्यमातून दूरच्या ठिकाणी होणारा संपर्क लाभदायक ठरेल.

मकर

आजच्या दिवसाचा श्रीगणेश ईश्वरभक्ती आणि पूजा पाठ याने करावा. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी- व्यवसायात लाभ होईल. तब्बेत चांगली राहील. तरीही कोठे पडणे, जखम होणे यांपासून जपा असे श्रीगणेश सांगतात.

कुंभ

पैशाची देवाण- घेवाण किंवा जामीनकी आपली फसवणूक करणार नाही याकडे लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. तब्बेती विषयी समस्या उद्भवतील. पैशाची गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्या. कुटुंबातील सदस्यांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहा. एखाद्याचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होण्याची वेळ येईल.

मीन

समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारे आणि मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. संतती व पत्नीकडून लाभ होतील. मंगल कार्य आयोजित कराल. लग्नयोग आहेत. प्रवासाचे नियोजन कराल. श्रीगणेशाची कृपा राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click