March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे स्वास्थ्य बिघडेल. वेळेवर कामे पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वरिष्ठ अधिकारी आपल्या बाजूने असणार नाहीत. संततीशीपण मतभेदाची शक्यता आहे.महत्वाचे निर्णय न घेण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत.

वृषभ

आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपारनंतर मात्र तब्बेत जपणे आणि सावध राहणे याविषयी श्रीगणेश सूचना देतात. खर्च अधिक होईल.

मिथुन

कौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मनोरंजनाचे वारे मनात वाहतील. स्वकीय आणि मित्रांसोबत हिंडणे- फिरणे आणि मनोरंजक ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. मान- सन्मान प्राप्त झाल्याने मन संतुष्ट राहील.

कर्क

भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. कोणाशी वादविवाद करू नका. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्‍यांचे सहकार्य चांगले मिळेल.

सिंह

आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ति होईल. बौद्धिक चर्चा टाळा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. नवे कार्य हाती घेऊ नका. सट्टा- जुगारात धाडस करू नका.

कन्या

गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होतील. नवीन कार्याचा आरंभ करायला शुभ दिवस. प्रिय व्यक्तींशी सुसंवाद घडतील. विरोधकांवर विजय मिळवाल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बेचैन राहाल. आईची तब्बेत बिघडेल. स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे आज टाळावे.

तुळ

सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. भाग्यवृद्धीचे संकेत आहेत. कार्यात यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. साथीदारांबरोबर संबंध चांगले राहतील.

वृश्चिक

आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांना भेटण्याचा आनंद घ्या. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपले बोलणे किंवा कृती यामुळे कुटुंबात कोणाला दुःख होईल. ती व्यक्ती आणि आपण, दोघांचे मनात ग्लानी निर्माण होईल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. विद्यार्थ्यांना विद्यार्जनात अडचणी येतील.

धनू

वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. शस्त्रक्रिये सारख्या बाबी आज नकोत. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. मित्र आणि स्नेहीयांच्या भेटीमुळे आपणाला लाभ होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

मकर

सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. तब्बेत सांभाळा. वाहन चालवताना दक्ष राहा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजन, आनंद यासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरीची कामे जपून करा.

कुंभ

आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल असे संकेत श्रीगणेश देतात. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. कामाच्या जागी वरिष्ठ आपल्या कामावर खुश राहतील. बढतीचे योग आहेत. मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता.

मीन

व्यवसायिक आणि व्यापार्‍यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. प्रवास घडतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारानिमित्त दूर गावी जावे लागेल. संततीच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. तब्बेतही चांगली राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click