मेष
आज दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू नका असा गणेशजींचा सल्ला आहे. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवणे हिताचे ठरेल. राग, द्वेष यांपासून दूर राहा. शत्रूपासून जपा. तब्बेतीकडे लक्ष दया. आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टिने दिवस चांगला. गूढ विद्या आणि रहस्य यां विषयी आकर्षण वाटेल.चिंतन आणि मनन मनाला शांती देईल.
वृषभ
धंदा- व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिस्पर्धी आश्चर्यचकित होतील. दुपारनंतर चांगले मनोरंजन होईल. प्रिय व्यक्ती आपल्या मनाला आनंद देतील. कपडे आणि गृहोपयोगी वस्तू खरेदीवर खर्च होईल. मान- सम्मान मिळेल.
मिथुन
आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा यात जाईल. आपली कल्पनाशक्ति व सृजनशीलता कामात वापराल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया सावध राहाल. दुपारनंतर व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता. घरात शांतता व समाधान नांदेल.
कर्क
निराशेमुळे मन अस्वस्थ राहील. त्यामुळे शरीरही अस्वस्थ बनेल. प्रवासाला दिवस प्रतिकूल आहे. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपारनंतर सुख शांती लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. जास्त विचार केल्याने मन विचलित होईल.
सिंह
आज जवळचा प्रवास होईल असे संकेत गणेशजी देत आहेत. परदेशस्थांकडून चांगल्या वार्ता प्राप्त होतील. धनलाभ होईल. नवीन कार्य हाती घ्या. दुपारनंतर आपण सहनशील बनाल. मानसिक निराशा होईल. शारीरिक स्वास्थ्य पण चांगले राहणार नाही. कुटुंबीय, जमीनजुमळा व संपत्ती याविषयी समस्या उद्भवतील.
कन्या
मनाची द्विधा अवस्था विचारात घेता, नवीन कार्याचा आरंभ करू नका असा सल्ला गणेशजी देत आहेत. बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर मन दुखावण्याचे प्रसंग येतील. कुटुंबीयांबरोबर वाद-विवाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. दुपारनंतर मात्र अनुकूल वातावरण आहे. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. प्रवासासाठी दिवस चांगला आहे. भाग्यवृद्धिचे संकेत.
तुळ
गणेशजी सांगतात की आज कलात्मक व सृजनशक्ति खचितच वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दृढ विचार आणि विचारातील समतोल यामुळे हाती घेतलेले काम सहज पूर्ण कराल. वस्त्रालंकार आणि मनोरंजन यांवर पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. कुटुंबातील व्यक्तींशी शक्यतो मतभेद टाळावेत. आपला अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेतल्यास वातावरण ठीक राहील.
वृश्चिक
आपला संतापी व अनियंत्रित व्यवहार आप्ल्यास अडचणीत आणेल. संबंधिता बरोबर अप्रिय घटना घडतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थाकडे लक्ष द्याल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन कराल. आज आपला आत्मविश्वास वाढीस लागेल असे श्रीगणेशजींचे सांगणे आहे.
धनू
व्यवसाय- धंद्यात आजचा दिवस आपणांस फायदेशीर राहील असे गणेशजी सांगतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामात बढती मिळेल. मित्रांसह प्रवासासाठी बाहेर जाल. व्यापारीवर्गाला लाभ होईल. श्रीगणेशजी सूचना देतात की दुपारनंतर तब्बेत सांभाळून राहा. अविचाराने केलेले कोणतेही कार्य आपणांस अडचणीत टाकेल. व्यावसायिक क्षेत्रात संतापाने बोलण्याआधी विचार करा. वाणीवर नियंत्रण ठेवा.
मकर
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंदाचा धंदा-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात अनुकूलता राहील. सहकारी चांगले सहकार्य करतील. दुपारनंतर मित्र भेटतील, आणि एखादया रमणीय स्थळाला भेट देऊ शकाल. उत्पन्नात वाढ होईल. व्यापारी बंधूंना व्यापारात लाभ होतील.
कुंभ
आज बौद्धिक काम, नवनिर्मिती आणि लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू कराल. दूरचा प्रवास आणि धार्मिक सहलींचे आयोजन कराल. व्यवसायात नफ्याच्या संधी जरा जपून राहा. तब्बेतीकडे लक्ष दया. दुपारनंतर मात्र कुटुंबात हर्षोल्हास निर्माण होईल. मातृक लाभाची शक्यता. उत्तम सुख लाभेल. शासकीय कामात यश मिळेल असे गणेशजी सांगतात.
मीन
गणेशजी आज आपणाला उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. हितशत्रूपासून सावध राहा. गूढ विद्येचे ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टिने दिवस चांगला आहे. दुपारनंतर परदेशात वास्तव्यास असणार्या मित्र परिवाराकडून वार्ता समजतील. धंदा- व्यवसायात सहकार्य मिळेल. कोणाच्या वादविवादात भाग न घेण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत.