May 18, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य वाढेल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपणाला यशकीर्ती मिळेल. व्यापारात भागीदारांबरोबर चांगले संबंध राहतील.जीवनसाथीदाराबरोबरच्या संबंधात जवळीक वाढेल.

वृषभ

आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक दृष्ट्या पण तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. आपण केलेल्या कामाची प्रशंसा झाल्याने आपणाला आनंद वाटेल. माहेरहून चांगल्या वार्ता समजतील

मिथुन

आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल. उग्रतापूर्ण बौद्धिक चर्चेत भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

कर्क

अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यासमोर टिकून राहाल. दुपारनंतर थोडी प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. आईच्या अनारोग्यामुळे चिंतेत राहाल. आर्थिक कष्टाची शक्यता.

सिंह

आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मात्र सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. भावंडांकडून लाभ होईल. आध्यात्मिक क्षेत्रात सिद्धी प्राप्त होईल.

कन्या

आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश मिळेल आणि लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.

तुळ

संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. गैरसमज दूर करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. दुपारनंतर मात्र प्रसन्नता लाभेल. आर्थिक दृष्ट्या लाभ होईल.

वृश्चिक

जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. तेथे आपला वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढेल असे श्रीगणेश सांगतात. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका. मित्रांशी विचार न जुळल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

धनू

श्रीगणेश कृपेने आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप वरचे पद मिळेल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण असेल. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास, पर्यटनाचा योग आहे. धनलाभाच्या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे. संततीविषयक शुभ वार्ता समजतील.

मकर

परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात पदोन्नती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांना पण आपल्या कामामुळे आनंद वाटेल. धना बरोबरच मान- सन्मान वाढीस लागेल. पित्याकडून लाभ होतील. गृहस्थ जीवनात मतभेद होऊ शकतात

कुंभ

नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी उग्र चर्चा अथवा मतभेद टाळू शकाल. दुपारनंतर प्रसन्नता वाढेल तब्बेतीतही सुधारणा जाणवेल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन कराल. भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक लाभ होईल.

मीन

व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. असे श्रीगणेश सांगतात. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल. दुपारनंतर नवीन कार्याचा आरंभ करू नका. प्रवास टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील व्यक्तींशी भांडण होऊ शकते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *