मेष
आज आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहील तसेच मनही प्रसन्न असेल. काल्पनिक जगातून सहल करताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात तुम्ही नवनिर्मिती दाखवाल, विद्यार्थी अभ्यासात चमकतील. घरातील वातावरण शांततापूर्ण असेल. रोजच्या कामात काही अडथळे येतील. व्यवसाय धंद्यात अधिकारीवर्गाशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.गणेशजी म्हणतात की, जास्त श्रम घेऊनही त्यामानाने फलप्राप्ती कमी होईल.
वृषभ
आज आपण वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे असे श्रीगणेश सांगतात. जलाशयापासून दूर रहा. जमीन आणि संपत्ति यांच्या कागद-पत्रांवर सही करताना काळजी घ्या. दुपारनंतर परिस्थिती मध्ये सुधारणा होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात विविध कल्पना येऊन एका वेगळ्याच विश्वात रमाल.
मिथुन
श्रीगणेश कृपेने आजचा दिवस सुखा- समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांची गर्दी होऊन मन काळवंडेल. वेळेवर जेवण मिळणार नाही. जास्त हळुवार बनाल. घरातील वातावरण उग्र राहील. जमीन वा इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. जास्त भावूक न बनण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.
कर्क
लाभ देण्यासाठी आजचा दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहज पार पडतील. दुपारनंतर प्रवास सहलीचा बेत आखाल. सहकार्याशी जवळीक वाढेल. तब्बेत चांगली राहील. मनाची प्रसन्नता दिवसाचा आनंद वाढवेल.
सिंह
आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलपूर्ण राहील असे श्रीगणेश सांगतात. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणारे स्वकीय व मित्र यांच्याशी खूप काळानंतर होणारा व्यवहार आज आनंददायी व लाभ देणारा ठरेल.
कन्या
भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका. गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कोणाशी उग्र वाद किंवा भांडण टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद टाळा. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. दुपारनंतर वडील आणि वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनातील चिंतेचा भार कमी होईल व मन आनंदी बनेल. आरोग्याच्या बाबतीत असमाधानच.
तुळ
श्रीगणेश सांगतात की आज नवे कार्य हाती घेऊ नका. वैचारिक पातळीवर मन अडकून पडेल आणि मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. दुपारनंतर मात्र हळुवारपणा वाढल्याने मन व्यग्र बनेल. काळजीमुळे मनस्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. उक्ती आणि कृती यांत संयम बाळगा. खर्च वाढेल.
वृश्चिक
व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल असे श्रीगणेश सांगतात. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल. दिवसभर वैचारिक पातळीवर अनिश्चिततेचे मळभ राहील. त्यामुळे अंतिम निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. असे निर्णय दुपारनंतर घेऊ नका.
धनू
आज स्वाभावात उग्रपणा आणि तब्बेत कमजोर राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. व्यवसायात अडथळा किंवा विवाद होण्याची शक्यता. दुपारनंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. स्थावर संपत्ती व्यवहारासाठी अनुकूल काळ. पित्याकडून लाभ होईल. आरोग्य सुधारेल.
मकर
आजारपणावर खर्च करावा लागेल असे श्रीगणेश सांगतात. अचानक धन खर्चाची शक्यता. घरातील सदस्यांबरोबर खडाजंगी होणार नाही याचे भान ठेवा. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका. निरर्थक वाद-विवाद व चर्चा यापासून दूर राहा.
कुंभ
आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून काम करा असा सल्ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. व्यवसाय क्षेत्रात वरिष्ठ अधिकार्यांशी वाद शक्यतो टाळा. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही असे श्रीगणेश सांगतात.
मीन
श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. जीवनसाथी बरोबर मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. जोडीदाराच्या तब्बेतीची चिंता राहील. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.