February 2, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

स्वभावातील तापटपणा आणि हट्टी वागण्यावर नियंत्रण ठेवा असा सल्ला श्रीगणेश देतात. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक कमजोरी जाणवेल. यात्रा- प्रवास यासाठी काळ योग्य नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्याशिवाय पाऊल उचलणे हानिकारक ठरेल. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ

आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास यांची महत्त्वाची भूमिका राहील. वडील घराण्याकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश आणि फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडू यांना आपले कौशल्य दाखविण्यास योग्य काळ आहे. तरीही संपत्ती विषयक कायदेशीर दस्तऐवज आज न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

मिथुन

दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. भाग्योदयाच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार तुम्हाला अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक आणि शेजारी- पाजारी यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. श्रीगणेशाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने आपणाला लाभ होण्याचे योग आहेत.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. असंतोषाच्या भावनेने मन घेरले जाईल. अनैतिक गोष्टीत पडू नका असा श्रीगणेशांचा सल्ला.

सिंह

आत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. उक्ती आणि कृतीत उग्रपणा आणि कोणाशी अहंपणाने संघर्ष होण्याची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. तब्बेतीची थोडी कुरकुर राहील. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. सरकारी कामे जलदगतीने होतील असे वाटेल.

कन्या

शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील असे श्रीगणेश सांगतात. एखाद्याशी तंटाबखेडा होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्यजीवनात खटका उडेल. मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य राहील. नोकर वर्गाकडून त्रास संभवतो.

तुळ

गृहस्थी जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचा योग आहे. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याचे संकेत आहेत. परिवारातील व्यक्ती आणि मित्रांच्या सहवासात खुश राहाल. आनंददायक प्रवास होईल. व्यापारी वर्गाला लाभकारक व्यापार होईल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. श्रीगणेशांची पूर्ण कृपा आपणावर राहील.

वृश्चिक

श्रीगणेशाच्या कृपेने आपली सर्व कामे यशस्वी पूर्ण होताना अनुभवाल. संसारात आनंदात आणि समाधानात राहील. समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल. तब्बेत चांगली राहील. वरिष्ठ अधिकारी आणि वडीलधारे यांची मर्जी राहील. संततीच्या समाधानकारक प्रगतीचा आनंद मिळेल. येणी वसूल होतील.

धनू

आज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरीधंद्यात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांवर अत्यंत दक्षपणाने सामना करा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत.

मकर

नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांबरोबर अंतर्गत मतभेद वाढतील. क्रोध- आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशासनिक बुद्धिमत्ता दुर्लक्षित होईल.

कुंभ

प्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन, मनोरंजन आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसमवेत भोजनानिमित्त जाण्याचा योग येईल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्तीचे योग आहेत. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळेल. आत्मविश्वासाने कार्यात यश मिळेल. श्रीगणेशाचा आशीर्वाद आपणांस आहे.

मीन

दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती आणि कृती यात सांभाळून काम करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. प्रतिस्पर्ध्यांना चित कराल. सहकार्‍यांचे सहकार्य आपले व्यावसायिक काम सरळ बनवतील. मातुल घराण्याकडून लाभ होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click