February 2, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष व्यवसायात उतावळेपणा करु नका. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. नोकरदार व्यक्तिंनी सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. ही अपेक्षा करु नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करु नये. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृषभ – ग्रहांची साथ आहे त्यामुळे नवीन कामांना गती येईल. व्यवसायात कामात उलाढाल वाढेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरी हातून कौतुकास्पद कार्य घडेल. बढती मिळण्याची शक्‍यता. आर्थिक लाभ होतील. शुभवार्ता कळतील. महिलांना घरासाठी नवीन खरेदीचे योग येतील. प्रकृतीची मात्र कुरबुर राहील तरी काळजी घ्या. कलाकार, खेळाडूंना मानसन्मान मिळतील.

मिथुन
”आपले काम बरे की आपण बरे’ हे धोरण लाभदायी ठरेल. व्यवसायात अनपेक्षित खर्च वाढतील. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत जिभेवर साखर पेरुन बोलावे. फुकटचे सल्ले देऊ नयेत. सहकारी कामात मदत करतील. महिलांना खर्चाची हातमिळवणी करताना नाकीनऊ येतील. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

कर्क
अशक्‍यप्राय कामे शक्‍य करुन यश संपादन कराल. धंदा व्यवसायात कामांना झालेला विलंब आर्थिक फटका देईल. कामाच्या कार्यपद्धतीत बदल करुन नुकसान भरपाई करण्याचा इरादा राहील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. सहकार्याकडून खुबीने कामे करुन घ्या. महिलांना चिंता निरसन झाल्याचे मानसिक समाधान मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

सिंह
व्यवसायात लवचिक धोरण लाभदायी ठरेल. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. आर्थिक बाबतीत चोखंदळ रहा. नोकरीत केलेल्या कामाचे यश मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. अधिकार मिळतील. महिलांना कामाचा आनंद मिळेल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत थोडी कुरबुर राहील. आवडत्या व्यक्तिंचा सहवास लाभेल.

कन्या
बौद्धिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळेल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. कामाच्या पद्धतीत बदल करुन प्रगती कराल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्व कळेल. केलेल्या कामाचे श्रेय देतील. महिलांना कौटुंबिक सुख व आर्थिक ऊब मिळेल. मन प्रसन्न राहील.

तूळ
व्यवसायात कामाचा उरक पाडाल. कामाचा मनस्वी कंटाळा असेल. त्यामुळे विश्रांती घ्याल. पैशाची वसुली करण्यावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामात चालढकल कराल. सहकाऱ्यांवर बरीचशी मदार राहील. गैरसमजुतीने वादविवाद होणार नाहीत याकडे लक्ष दया. महिलांना घरात मनाविरुद्ध वागावे लागले तरी चिडू नका. आवडत्या छंदात मन रमवावे.

वृश्‍चिक
सर्व महत्वाचे ग्रह अनुकुल नाहीत. तरी धाडस करु नका. व्यवसायात प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाका. स्वतःची कुवत ओळखून कामे स्विकारा. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हिताचे ठरेल. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करुन घ्या. बेकार व्यक्तिंना नवीन कामाची संधी दृष्टीक्षेपात येईल. घरात महिलांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. विश्रांती घ्याल. मुलांकडून त्रास होण्याची शक्‍यता.

धनू
”रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती सध्या तुमची असेल. कामाचे योग्य नियोजन भविष्यात लाभदायी ठरेल. व्यवसायात प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. उत्साही रहाल. नोकरीत केलेल्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्व कळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना आनंदाची बातमी मन प्रफुल्लीत करेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. नवीन खरेदीचे बेत ठरतील. तरूणांना मनपसंत जीवन साथी भेटेल. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.

मकर
सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कृती करा. यश मिळेल. व्यवसायात नवीन पद्‌धतीचा अवलंब फायदे मिळवून देईल. पैशाची स्थिती समाधानकारक असल्याने मनाप्रमाणे खर्च करू शकाल. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात उभे रहाल. त्याचा भविष्यात फायदाच होईल. कामात मात्र यश मिळवाल. मानसिक समाधान मिळेल. घरात महिलांना दगदग, धावपळ वाढेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. तरूणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.

कुंभ
”हाती घ्याल ते तडीस न्याल’ व्यवसायात कामात विशेष चमक दाखवाल. जुनी येणी वसुल होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत किचकट कामे हाती घ्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या विश्‍वासास पात्र ठराल. जोडधंदयातून विशेष लाभ मिळू शकेल. महिलांचा कामात वेळ जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलावंत, खेळाडूंना नैपुण्य मिळेल.

मीन
आनंदी वातावरण मन प्रसन्न राखेल. व्यवसायात कामांना गती येईल. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत कामात जोश येईल. नवीन संधी मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होईल. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. स्वप्ने साकार होतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click