November 28, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात आज आपला स्वभाव हळूवार बनेल ज्यामुळे कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारातून आपल्या भावना दुखावतील. आईच्या तब्येतीमुळे आपण खूप चिंतित राहाल. स्वाभिमानही दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण, झोप यात अनियमितता राहील. स्त्री आणि पाणी यापासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी मध्यम काळ. मनःशांतीसाठी आध्यात्म हाच योग्य उपाय राहील.स्थावर मालमत्ते विषयी चर्चा टाळा.

वृषभ

चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज तुम्ही भावुक आणि संवेदनशील राहाल, ज्यामुळे कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र यात आज तुम्ही काम करू शकाल. कौटुंबिक सदस्य विशेषतः मातेबरोबर चांगले जमेल. छोटा प्रवास योग आहे. आर्थिक गोष्टींवर लक्ष द्याल. श्रीगणेश कृपेने तुमचा सगळा दिवस आंदात जाईल.

मिथुन

श्रीगणेश सांगतात की सुरवातीच्या त्रासानंतर तुम्ही ठरवलेली कामे पार पडतील ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे तुमचे कीतीतरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी व्यवसायात सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तींच्या बरोबर भेटी झाल्याने आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील.

कर्क

आपले मित्रपरिवार व कुटुंबीय यांच्याबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला मिळेल तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद मिळेल. शुभ समाचार व आर्थिक लाभ ही मिळतील. पत्नीबरोबर वेळ चांगला जाईल. श्रीगणेश म्हणतात की, आज शारीरिक व तसेच मानसिक आनंदाचा उपभोग घ्याल.

सिंह

श्रीगणेश आज आपल्याला कोर्ट कचेरीच्या बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मन चिंतीत असेल व बेचैनही असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन यावर संयम ठेवणे आवश्यक आहे नाहीतर कोणाशी तक्राक होऊ शकते. आपण आज हळवे बनाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. स्त्रीवर्गापासून जरा सांभाळूनच. गैरसमज होऊ देऊ नका नाहीतर नुकसान होऊ शकते.

कन्या

श्रीगणेशांचा आशीर्वाद आज आपल्याला यश, कीर्ती व लाभ मिळवून देईल. लक्ष्मीची कृपा आज आपल्याला मिळेल. वाडवडील आणि मित्र यांच्याबरोबर आपला दिवस आनंदात जाईल. प्रवासही घडू शकतो. पत्नी आणि मुले यांच्याबरोबर चांगला वेळ जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संततीकडून वार्ता समजतील. प्रिय व्यक्ती बरोबर भेट होईल.

तुळ

आज आपले घर आणि कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीचा योग आहे. वरिष्ठ आज तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंदी व उत्साहाचे वातावरण राहील. मातृघराण्याकडून फायदा मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल.

वृश्चिक

श्रीगणेश म्हणतात की आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास वाढेल. वरिष्ठ आज आपल्याशी नकारात्मक वागतील. संततीबरोबर ही मतभेद संभवतो. श्रीगणेशानुसार महत्त्वपूर्ण निर्णय आज स्थगित ठेवणं हेच फायदेशीर ठरेल.

धनू

श्रीगणेश म्हणतात की, आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नका तसेच तब्येतीकडे लक्ष द्या. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. शस्त्रक्रिया आजच्यासाठी टाळा. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानक कोणता आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. वाणी आणि वागणे यावर संयम ठेवावा.

मकर

रोजचे काम सोडून आज आपण मनोरंजन आणि गाठी भेटी यात वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांबरोबर फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर चांगला वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. मोठ्या धनलाभचा योग आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इ. तून भरपूर आय राहील. मान सन्मान वाढेल. कामातील सफलते बरोबर स्वास्थ्यही चांगले राहील.

कुंभ

कामात यश मिळवण्यासाठी उत्तम दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. केलेल्या कामातून यश व कीर्ती मिळेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तनमनाला उत्साह जाणवेल. नोकरीधंद्यात सहकार्य लाभेल. मातुल घराकडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. आजारी व्यक्तिच्या तब्येतीत सुधारणा होईल.

मीन

आज आपली कल्पनाशक्ती चमकेल. साहित्यनिर्मितीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतील. तुमच्या स्वभावात हळवेवणा व कामुकता राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनातः भीती असेल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. प्रणयासाठी अनुकूल दिवस आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *