March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल असे श्रीगणेश सांगतात. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल. त्यामुळे उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल.अर्थविषयक कामे कराल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल.

वृषभ

महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. धनलाभाची शक्यता. शारीरिक आणि मानसिक दृष्टी या उत्साही राहाल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात द्विधा वाढेल. आलेली संधी गमावून बसाल. हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष, होण्याची शक्यता. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी प्रेम आणि सहकार्र्याची भावना राहील.

मिथुन

आज सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. घरात कुटुंबीयांचा विरोध राहील. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक व्यग्रता अनुभवाल. दुपारनंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनावर खर्च कराल.

कर्क

आज व्यापारात लाभाचे योग श्रीगणेश सांगतात. रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. दुर्घटनेपासून जपून राहा.

सिंह

नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत दिवस आनंदात जाईल. उत्पन्न वाढेल. छोटा पण आनंददायक प्रवास होईल.

कन्या

आपल्या व्यवसायात इतरांनापण धनलाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्बेत सांभाळून राहा. दूरस्थ स्नेह्यांकडून वार्ता प्राप्त होतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. व्यवसायात बढतीमुळे लाभ होईल. सन्मान मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

तुळ

आळस आणि जास्त कामाचा भार यामुळे मनाची व्याकुळता राहील. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने आरोग्याला घातक अन्न ग्रहण करू नका. प्रवासात विघ्ने येतील. पण दुपारनंतर मात्र दूरस्थ मित्र व संबंधितांकडून वार्ता येतील आणि आपला आनंद द्विगुणित होईल. नवीन कार्यारंभाच्या दृष्टीने पण आजचा दिवस उत्साह देणारा. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारात लाभ होण्याची शक्यता.

वृश्चिक

सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्यापिण्याचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात विघ्न येऊ शकते. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती आपली मदत करतील.

धनू

आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. योजने प्रमाणे कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. गृहस्थीजीवनात गोडी राहील. अचानक धनलाभ होईल. छोटया प्रवासाचे बेत आखाल. व्यापारी वर्गाचा व्यापार वाढेल. परदेशस्थ स्वकार्र्यांकडून आनंदाच्या वार्ता येऊन घडकतील.

मकर

कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. तरीही कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. तब्बेत चांगली राहील. त्या दृष्टीने बाहेरचे खाणे-पिणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील व ते सुधारेल. आर्थिक लाभ हमखास होतील. माहेरकडून आनंदी वार्ता येतील. सहकारी योग्य सहकार्य करतील.

कुंभ

विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. वडिलांकडून तसेच सरकार कडून लाभ होतील. खंबीर मनोबल असेल. त्यामुळे कार्यपूर्ती होण्यात कसलीच अडचण येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा. लेखन- वाचन यांत गोडी वाढेल. धनविषयक नियोजन योग्य प्रकारे कराल.

मीन

काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्या-पिण्याचे बेत कराल. आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने दैनंदिन काम पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ. संततीसाठी अनुकूल दिवस. पित्याकडून लाभ होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click