November 28, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समझोतापूर्वक व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पैसा खूप खर्च होईल.खाण्यापिण्यावर संयम ठेवा

वृषभ

श्रीगणेश सांगतात की खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण आणि वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने आणि मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम दांपत्यजीवनाचा आनंद मिळेल. धनलाभाची अपेक्षा करू शकता.

मिथुन

श्रीगणेशांचे सांगणे आहे की आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय आणि सगे- सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. मान- प्रतिष्ठेची हानी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खास शौक- मजा आणि मनोरंजन यावर खर्च होईल. बुद्धी शांत ठेवून वागण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

कर्क

आर्थिक नियोजन आणि नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. उद्योग- धंद्यात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. मित्र, पत्नी, मुलगा अशा सर्वांकडून शुभ वार्ता मिळतील. मंगलकार्ये होतील. प्रवास आणि विवाहाचे योग आहेत. प्रणयाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. उत्तम वैवाहिक सुखाचा आनंद मिळेल, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह

नोकरी आणि व्यवसायात लाभदायक आणि यशदायी दिवस आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल आणि प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास आणि दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता. वडिलांकडून लाभ होईल. जमीन, वाहन इ. व्यवहारांसाठी अनुकूल काळ आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात कौशल्य दाखविण्यासाठी वेळ उत्तम आहे असे श्रीगणेश सांगतात.

कन्या

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपला धार्मिकते मध्ये खर्च होईल. एखाद्या तीर्थस्थानी संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. शरीर आणि मन एकदम स्वस्थ राहील.

तुळ

अचानक धनलाभाचा दिवस आहे. आध्यात्मिक वृत्ती आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका असे श्रीगणेश सुचवितात. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जलाशय आणि स्त्री वर्गापासून सावध राहा. ईश्वराची भक्ती आणि गाढ चिंतन शक्ती मनाला शांती देईल.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की दैनंदिन घटनाक्रम चक्रात बदल होईल. आज मौज- मजा आणि मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र आणि कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे आणि वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. दांपत्यजीवनात उत्तम क्षणांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट आणि धनलाभ होईल.

धनू

नोकरदारांना लाभदायक दिवस. आर्थिक लाभाची शक्यता. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर आणि सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांची चाल निरूपयोगी ठरेल. मैत्रीणींची भेट होईल. श्रीगणेशांचा आशीर्वाद आपणाला आहे.

मकर

श्रीगणेश सांगतात की कला आणि साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती आज त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक आणि सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. त्यांच्या भेटी रोमांचक ठरतील. शेअर- सट्टा यात लाभ होईल. संततीच्या समस्या मिटतील. मित्रांकडून लाभ होईल.

कुंभ

स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य- प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. स्वभावात हट्टीपणा राहील. सार्वजनिक क्षेत्रात कोठे मानहानी न होण्याची दक्षता घ्या, असे श्रीगणेश सांगतात.

मीन

श्रीगणेश सांगतात की कार्यात यश मिळणे आणि महत्वपूर्ण निर्णय घेणे यांसाठी उत्तम दिवस आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. जीवनसाथी बरोबर जवळीक वाढेल. मित्रांसोबत लहानशी यात्रा कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *