February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाटेल आणि त्यामुळे कामे बिघडतील. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करा. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गाने होईल असे श्रीगणेशांना वाटते.

वृषभ

आजचा दिवस काळजीपूर्वक राहा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. नवीन कार्याचा आरंभ करू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा आणि मानसिक व्यथा अनुभवाल. ऑफिसमध्ये कामाचा भार वाढल्याने अधिक थकवा जाणवेल. प्रवास लाभदायी होणार नाहीत. शक्य असेल तर अध्यात्मासाठी वेळ काढा.

मिथुन

दिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी भेट होईल. मित्र आणि प्रिय व्यक्तींसमवेत मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल व परिधान करण्याची संधी मिळेल. प्रणयासाठी उत्तम दिवस. भोजनात मिष्टान्न मिळेल. तब्बेत चांगली राहील. सामाजिक सम्मान आणि प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक सुख चांगले मिळेल. दिवसभर गणेशाची कृपा राहील.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज दिवस चांगला जाईल. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. तब्बेत चांगली राहील. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ जाईल. नोकरदारांना नोकरीत लाभ होतील. कनिष्ठांकडूनही फायदा मिळेल. मैत्रीण भेटल्याने आनंद होईल. शत्रूवर विजय मिळवाल.

सिंह

आजचा दिवस आनंदात जाईल. अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलस्वरूप होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्या दृष्टीने प्रगतीच्या वार्ता मिळतील. अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप चांगला दिवस आहे. मित्र भेटतील. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. श्रीगणेशांच्या मते आज आपल्या हातून परोपकार घडेल.

कन्या

आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवा. स्त्री आणि पाण्यापासून हानी होण्याचे भय. इतरांसमोर अपमान होणार नाही याची दक्षता घ्या. नाहक खर्च होईल.

तुळ

आजचा दिवस शुभ फलप्राप्तीचा आहे असा संकेत श्रीगणेश देतात. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घरविषयक प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया धार्मिक ठिकाणी जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या वार्ता मिळतील. व्यावहारीक कारणांनी यात्रा कराल. नव्या कामाचा आरंभ करण्यास चांगला दिवस. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. गुंतवणूक करण्यास दिवस चांगला आहे. भाग्योदयाचा दिवस.

वृश्चिक

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस साधारणच आहे. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करा. शारीरिक त्रास आणि मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार करू नका. अनैतिक कार्यापासून अलिप्त राहाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात अडथळे येतील.

धनू

आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी गप्पागोष्टी होऊन मन प्रसन्न राहील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल.

मकर

आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येतील. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह आणि प्रसन्नता नाहीशी होईल. अपघात व ऑपरेशन पासून सांभाळून राहा. कष्टाच्या मानाने फळ मिळणार नाही म्हणून निराश व्हाल.

कुंभ

आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात आज लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल. त्यांच्या बरोबर प्रवासही ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुंना आशादायक.

मीन

श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा जाईल. कामे यशस्वी होतील आणि वरिष्ठ अधिकारी संतुष्ट असतील त्यामुळे आनंदी दिवस जाईल. व्यापार्‍यांच्या व्यापारात वाढ होईल. वडील आणि वाडवडील यांच्याकडून फायदा होईल. लक्ष्मीची कृपा राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. सरकारकडून फायदा होईल. मान- सम्मान मिळेल. पदोन्नती होईल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click