September 30, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. गुप्तशत्रूपासून सावध राहा. रहस्यमय गोष्टीत गोडी वाटेल आणि गूढ विद्येप्रती आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवे कार्य हाती घेऊ नका. आध्यात्मिक सिद्धि प्राप्त होईल.

वृषभ

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. स्वकीय आणि जवळच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या वार्ता येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. विवाह सुख मिळेल. अचानक धनलाभ होईल.

मिथुन

आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो नाहक जाणार नाही. आर्थिक लाभाची शक्यता. तब्बेत चांगली राहील. कामात यश मिळेल. स्त्री वर्गाशी भेट होईल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण वाढेल. अकारण उग्रपणा टाळा. अन्यथा काम बिघडू शकते. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. मानसिक अशांतता आणि उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तींकडून मन दुखावेल जाईल किंवा अबोला धरला जाईल. कामुकते मुळे अपमान होणार नाही याची काळजी घ्याल. शक्यतो यात्रा प्रवास टाळावा.

सिंह

श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा नाही. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला जास्तच भास होतील. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अधिक संवेदनशील बनाल. स्त्री तसेच पाणी यपासून जपून राहा. वेळेवर जेवणाची व्यवस्था होणार नाही. नोकरदारांना नोकरीची चिंता राहील. मिळकतीच्या व्यवहारात सावधानता बाळगा.

कन्या

कोणत्याही कामात विचार न करता भाग घेण्यास श्री गणेश तुम्हाला मना करताहेत. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे बनाल. आप्तमित्र यांची भेट होईल. भावंडाकडून फायदा होईल. शत्रूचा सामना करू शकाल. अध्यात्म आणि गूढ विद्या यात सिद्धी मिळेल.

तुळ

गणेशजी सांगतात की, आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय नक्की होत नाही असे झाल्याने नवीन कामे सुरू करू नका. संबंधितांशी दुरुनच संबंध ठेवा नाहीतर मतभेद होतील. व्यवहारात जिद्द सोडा. प्रवास करू नका. आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींशी वाद घालू नका. महत्त्वपूर्ण विषयावर आज निर्णय घेऊ नका, असे श्रीगणेश सांगतात. आरोग्यास सांभाळून राहा.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रियजनांशी सफल भेटी होतील. नवीन वार्ता समजतील. आनंददायी प्रवास घडतील. उत्तम वैवाहिक सुखाची प्रचिती येईल.

धनू

आजचा दिवस कष्टप्रद आहे. म्हणून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कुटुंबियां सोबच मतभेदाचे प्रसंग घडतील. स्वभावात रागीटपणा आल्याने कोणाशी वाद घालू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. वर्तन आणि बोलणे यावर संयम ठेवा. दुर्घटनेपासून सावध राहा. पैसा जास्त खर्च होईल. कोर्टकचेरीचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवा. फुकटच्या कामातून मनःशांती भंग पावेल.

मकर

सामाजिक कार्यांतून लाभ होईल कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतून लाभ होण्याचा आज योग आहे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी व मुलांचा सहवास लाभेल. खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. शेअर बाजारातून फायदा होईल. पत्नीच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील.

कुंभ

आज आपल्याला अनुकूल दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. उच्च पदाधिकारी आणि वडीलधार्‍यांचे आशीर्वाद आज आपणाला आहेत. त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. गृहजीवन आनंदी राहील. मान- मरातब वाढतील.

मीन

मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांबरोबर सांभाळून कार्य करण्याची सूचना श्रीगणेश देतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. दैव प्रतिकूल आहे असे वाटेल. मनात येणारे नकारात्मक विचार मनाचा कब्जा करणार नाहीत याची काळजी घ्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click