April 13, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यातच जाईल. सेवा- पुण्य यांची कामे हातून घडतील. मनाने खूप कामे ठरवलेली असतील. सत्कार्य हातून झाल्यामुळे शरीर व मनाला स्फूर्ती मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ

श्रीगणेश सांगतात की आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल.आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. तेच आपल्याला फायदायाचे ठरेल. त्यामुळे नवीन संबंधात सद्भाव वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढेल. कष्टाच्या मानाने कमी फळ मिळूनही त्या कामात तुम्ही सर्वात पुढे राहाल. आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

मिथुन

भावना आणि संवेदनशीलता यांच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध न ठेवण्याचे श्रीगणेश सांगत आहेत. पाणी किंवा प्रवाही पदार्थापासून घात होऊ शकतो, म्हणून त्यापासून दूर राहा. काही आजारामुळे मन द्विधा बनेल व एखादा निर्णय घेण्यात बाधा येईल. खूप विचार करण्यामुळे मानसिक थकवा येऊन झोप लागणार नाही व त्याचा स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होईल. कौटुंबिक संपत्तीची चर्चा किंवा वादविवाद यापासून दूर राहा. प्रवासही टाळा.

कर्क

आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल. कामात मिळालेल्या यशामुळे आपला उत्साह वाढेल. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. संबंधांमध्ये भावनीकता अधिक असेल. आपले प्रवास आनंददायी होतील. समाजात मान सम्मान मिळेल.

सिंह

आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचे चांगले सहकार्य देखील मिळेल. आर्थिक क्षेत्रात मिळकतीपेक्षा खर्च अधिक होईल. तरीही तुमच्या मधुर वाणीने सगळ्यांची मने जिंकाल, कामाचे व्यवस्थित आयोजन करा असा श्रीगणेश सल्ला देत आहेत.

कन्या

श्रीगणेश सांगतात की आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. शरीर, स्वास्थ्य आणि मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. शुभ समाचार मिळाल्याने तसेच प्रवास झाल्याने मन प्रसन्न बनेल.

तुळ

आजचा दिवस आपणासाठी प्रतिकूल असल्यामुळे सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आज तब्बेत बिघडेल. मानसिक दृष्टया पण अस्वास्थ्य जाणवेल. आपली उक्ती आणि कृती या मुळे कोणालाही भ्रांती होणार नाही याची सावधानता बाळगा. रागावर नियंत्रण ठेवा. जमेपेक्षा खर्च जास्त वाढेल.

वृश्चिक

आपणांस आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. आज मित्र भेटतील. आणि त्यांच्यासह हिंडण्या- फिरण्यात व मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वरिष्ठ अधिकारी आपणांवर प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण पसरेल.

धनू

कार्य साफल्याचा दिवस आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. सार्वजनिक जीवनात मानसन्मान वाढेल असे श्रीगणेश सांगतात.

मकर

श्रीगणेश सांगतात की बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्या चर्चा किंवा अनावश्यक खर्चापासून जपण्याचा सल्ली श्रीगणेश देतात.

कुंभ

अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही यांकडे लक्ष द्या. चोरी, अनैतिक काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात कोणाचा विवाहयोग आहे. खर्च वाढतील, त्यामुळे हात आखडता घ्याल. ईश्वरी नामस्मरण व आध्यात्मिक विचार मन शांत करतील.

मीन

आज आपणातील लेखक किंवा कलाकाराची कला व्यक्त करण्याची संधी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पाडल्याने दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह पार्टी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश व प्रसिद्धी वाढेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *