मेष
आज शरीर व मनाचे स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. घराबाहेरचे खाणे- पिणे टाळा. कामांच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांकडून लाभ होईल. मनात नकारात्मक आणि उदासीन विचार येऊ देऊ नका. आर्थिक दृष्टीने पण दिवस मध्यम जाईल असे श्रीगणेश सांगतात.
वृषभ
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.श्रीगणेशाचे सांगणे आहे की उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे फत्ते करण्यात भाग घ्याल. कामात सहजगत्या एकाग्र व्हाल. धनलाभ होईल आणि आर्थिक नियोजन पण सुयोग्य कराल. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. वाढता आत्मविश्वास अनुभवाल.
मिथुन
आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र आणि कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आपले बोलणे किंवा व्यवहार यांमुळे कोणाला त्रास होणार नाही याकडे लक्ष दया. दुर्घटनेपासून अत्यंत जपा. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन ग्रासून जाईल. अयोग्य कामावर शक्ती खर्च होईल. आध्यात्मिकता आणि दैवीशक्ती मदतीस येतील.
कर्क
आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. आणि उत्पन्नाचे प्रवाह वाढतील. मित्रांशी चर्चा होईल. त्यामुळे आनंद मिळेल. विवाहोत्सुकांना विवाह योग आहेत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी आणि मुलाकडून सुख प्राप्ती होईल. आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल असे श्रीगणेश सुचवितात.
सिंह
खंबीर मन आणि दृढ निश्चय यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्तीपासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील निपुण व्यक्तींना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. श्रीगणेश सांगतात की घराच्या कागदपत्रांसंबंधी दिवस चांगला आहे.
कन्या
आजचा दिवस फार शुभ आहे. धार्मिक कार्य आणि यात्रेच्या दृष्टीने अनुकूल काळ. मित्र आणि संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद मिळेल. विदेशातील स्नेह्यांकडून प्राप्त वार्ता आनंद देतील. भावंडांमुळे आर्थिक फायदा होईल.
तुळ
वाणीवर संयम ठेवा असे सांगताना श्रीगणेश सूचित करतात की सरकार विरोधी कामे, राग आणि कामवासना यांपासून दूर राहा. नवे संबंध अनिष्टकारी ठरतील. आर्थिक संकट येईल. परमेश्वाराची प्रार्थना आणि आध्यात्म आपणाला शांती देईल.
वृश्चिक
दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंदात मशगूल राहाल असे श्रीगणेशांना वाटते. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. समाजात मान सन्मान मिळेल. मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर हिंडणे- फिरणे आनंददायी होईल.
धनू
श्रीगणेशांना वाटते की आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य पण चांगले राहील. व्यवसायात लाभ होईल. सरकारी सहकार्य करतील. त्यामुळे आर्थिक लाभ होतील.
मकर
निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. प्राप्त परिस्थिती विचारात घेता श्रीगणेश आपणांस सल्ला देतात की प्रतिस्पर्ध्यांशी वाद करू नका.
कुंभ
आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य असेल. विद्यार्जन करणार्यांना विद्याप्राप्ती, यश मिळेल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रियांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. जमीन, घर, वाहन इ. दस्तावेज कागदपत्राविषयी सावध राहा.
मीन
महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अत्त्युत्तम आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा आणि मानसिक स्थिरता यांमुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पर्यटनस्थळी आयोजित सहलीमुळे मन प्रसन्न राहील. स्वकीयांशी जवळीक वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा बळावेल.