बीड – जिल्ह्यातील वाढत असलेला कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे .मंगळवारी प्राप्त झालेल्या 790 अहवालात तब्बल 93 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .गेल्या चार दिवसात जवळपास 400 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आल्याने बीड वासीयांची चिंता वाढली आहे .



जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचा वेग दुपटीने वाढला आहे .दररोज किमान शंभर च्या घरात रुग्ण सापडत असल्याने रुग्णसंख्या चार दिवसात चारशे पार गेली आहे .
मंगळवारी शिरूर ,पाटोदा प्रत्येकी 2,परळी 1,माजलगाव 11,केज 4,गेवराई 5,धारूर 1,बीड 43,आष्टी 2 आणि अंबाजोगाई मध्ये 22 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत .