December 10, 2022

गट क दर्जाच्या पदांच्या भरतीला लवकरच होणार सुरवात !

गट क दर्जाच्या पदांच्या भरतीला लवकरच होणार सुरवात !

मुंबई – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने विविध पदासाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती करण्यात येत असून यात ग्रामविकास विभागाची ही नोकर भरती महत्त्वाची मानली जाते.

गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यादरम्यान राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध लादण्यात आले होते. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्या अंतर्गत राज्य सरकारने गट क आणि गट ड वर्गासाठी 75 हजार नोकर भरती करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

ज्या विभागांचा किंवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागातील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरम्यास मुभा देण्यात येत आहे.

राज्यात शासकीय कर्मचारी यांची 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोणत्या विभागात अंदाजीत किती नोकर भरती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्य खाते – 10 हजार 568,गृह खाते – 14 हजार 956,ग्रामविकास खाते – 11,000,कृषी खाते – 2500,सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337,नगरविकास खाते – 1500,जलसंपदा खाते – 8227,जलसंधारण खाते – 2,423,पशुसंवर्धन खाते – 1,047

गृहविभाग- 49 हजार 851,सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822,जलसंपदा विभाग : 21 हजार 489,महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557,वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432,सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12,आदिवासी विभाग : 6 हजार 907,सामाजिक न्याय विभाग : 3 हजार 821 एवढी पदे आजमितीस रिक्त आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click