December 10, 2022

उद्धव गट न्यायालयात ! शिंदे गटाकडून त्याच चिन्हांची मागणी !!

उद्धव गट न्यायालयात ! शिंदे गटाकडून त्याच चिन्हांची मागणी !!

मुंबई- शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या मधील वाद संपण्याची चिन्हे नाहीत.निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उगवता सूर्य,मशाल आणि त्रिशूल हे चिन्ह सुचवले आहेत तर आता शिंदे गटाने देखील याच चिन्हावर दावा केल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

आज दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडे चिन्हे आणि नावे सादर करण्याची शेवटची मुदत होती. त्याप्रमाणे दोन्ही गटांनी आपली चिन्हं आणि नावं सादर केली आहे. यामध्ये खूपच साम्य असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही तीन चिन्हं सादर केली आहे. तर शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हं दिली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच दोघांची वेगळी चिन्हं आहेत.

नावांमध्येही असंच साम्य आढळून आलं आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावं सांगितली होती. तर शिंदे गटही बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे गटाकडून पक्षासाठी आनंद दिघेंचं नाव वापरण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आता या साम्यामुळे दोन्ही गटात नवीन वाद निर्माण होईल का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click