बीड न्यूज अँड व्युज – राज्यभरात गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांवर लवकरच गुन्हे दाखल होणार आहेत.त्यांच्या पगार बंद झाल्यानंतर आता शासनाकडून ही कारवाई केली जाणार आहे.त्याबाबत राज्य शिक्षण परिषदेने आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या काळात राज्यात शासकीय नोकरी मिळवण्यासाठी केलेले तीन मोठे घोटाळे बाहेर आले.आरोग्य सेवक पदभरती ,म्हाडा परीक्षा आणि टीईटी घोटाळा.या तिन्ही प्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलिसांनी केला.
टीईटी घोटाळ्यातील तब्बल 7874 परिक्षार्थीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले.त्यातील (न्यूज अँड व्युज) 576 उमेदवार हे बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीस लागल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे शालार्थ आय डी गोठवून ऑगस्ट पासून पगार बंद करण्यात आपले आहेत.
यामध्ये औरंगाबाद विभागातील 232 आणि बीड जिल्ह्यातील 40 शिक्षकांचा समावेश आहे.पगार बंद ची कारवाई झाल्यानंतर आता या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर केलेल्या नोकरीच्या काळातील पगार वसूल करण्यात येणार आहे.तसेच News&views या दोषी शिक्षकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांना आदेशात केले आहे.
येत्या काही दिवसात स्थानिक पातळीवर हे गुन्हे दाखल होतील अशी माहिती राज्य शिक्षण परिषदेच्या सूत्रांनी न्यूज अँड व्युज ला दिली आहे.