December 10, 2022

देशात 21 विद्यापीठ बोगस !

देशात 21 विद्यापीठ बोगस !

नवी दिल्ली- देशभरातील तब्बल 21 विद्यापीठ बोगस असल्याची माहिती युजीसी ने दिली आहे.विद्यार्थी आणि पालकांनी या विद्यापीठात प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर च्या एका विद्यापीठाचा समावेश आहे.

देशभरात 21 बोगस विद्यापीठे असून, सर्वाधिक बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत आहेत. या यादीत महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र बोगस विद्यापीठांची संख्या घटली आहे. गेल्या वर्षी 24 बोगस विद्यापीठे होती. त्यातील तीन विद्यापीठे कमी झाल्याचे दिसत आहे. यूजीसीच्या नव्या यादीनुसार दिल्लीत आठ, उत्तर प्रदेशमधील चार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एक बोगस विद्यापीठ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय, राज्य आणि अभिमत विद्यापीठांना किंवा संसदेने पारीत केलेल्या कायद्यानुसार संस्थांनाच पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अन्य संस्थांना नावात विद्यापीठ हा शब्द वापरता येत नाही. संबंधित 21 संस्था विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करीत असल्याने त्यांना बोगस ठरविण्यात आले आहे. त्यांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार नसल्याचे ‘यूजीसी’चे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी स्पष्ट केले.

दिल्ली
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस
कमर्शिअल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज
युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
व्होकेशनल युनिव्हर्सिटी
ए. डी. आर. – सेन्ट्रिक जुरीडीकल युनिव्हर्सिटी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग
विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी

आयोगाने बोगस ठरविलेली विद्यापीठे
फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट
आध्यात्मिक विश्वविद्यालय
महाराष्ट्र
राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर,पश्चिम बंगाल
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन, कोलकाता
इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन अँड रिसर्च, कोलकाता,उत्तर प्रदेश
गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर
नेताजी सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी, अलिगढ
भारतीय शिक्षा परिषद, लखनऊ,ओडिशा
नव भारत शिक्षा परिषद, रुरकेला
नॉर्थ ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड
टेक्नॉलॉजी, मयूरभंज,पुद्दुचेरी
श्री बोधी अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, थीलासपेट
आंध्र प्रदेश
क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर,कर्नाटक
बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी,केरळ
सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णाटम

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click