मुंबई- बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपाताच्या घटनांमुळे जिल्हा फेमस झाला आहे अस वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले अन विधानसभेत एकच गोंधळ उडाला.विरोधीपक्ष नये अजित पवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत फेमस हा शब्द वगळण्याची मागणी केली.त्यानंतर या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले .
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बक्करवाडी येथील शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला होता.या प्रकरणात शिकाऊ डॉक्टर सह अंगणवाडी सेविका,नर्स यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी गेवराईचे आ लक्ष्मण पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.अधिवेशनात यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली.गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा फेमस झाला आहे असे ते म्हणाले.यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला.
सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आरोग्यमंत्री यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी फेमस हा शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात यावा अशी मागणी केली.
त्यानंतर उत्तर देताना सावंत यांनी या प्रकरणाची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले.या विषयात आ पवार यांच्यासह आ प्रकाश सोळंके,आ नमिता मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केले.