March 30, 2023

जालन्यात स्टील उद्योजक तर औरंगाबाद मध्ये केटरर्स आणि बिल्डरवर छापे !

जालन्यात स्टील उद्योजक तर औरंगाबाद मध्ये केटरर्स आणि बिल्डरवर छापे !

जालना – शहरातील स्टील उद्योजक आणि औरंगाबाद येथील केटरर्स व्यावसायिक तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्यावर आयकर विभागाने घातलेल्या छाप्यात पाचशे कोटींपेक्षा अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.करचोरी करणाऱ्या उद्योजकांची माहिती काढण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी वऱ्हाडी बनून आठ दिवस जालन्यात हिंडत होते.त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जालन्याच्या उद्योजकांचे कनेक्शन औरंगाबाद च्या व्यवसायिकांशी लागल्याने तेथेही कारवाई करण्यात आली.

आयकर विभागाने जालन्यात केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज तसेच सुमारे 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल 13 तास लागले. 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते. जालन्यात मिळालेली ही राेकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन माेजण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली माेजणी रात्री 1 वाजता पूर्ण झाली.

जालना येथील कारवाई दरम्यान जी कागदपत्रे विभागाच्या हाती लागली त्यावरून औरंगाबाद शहरातील दोन केटरिंग व्यावसायिक तसेच जैन नामक बांधकाम व्यावसायिक यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. या दोन केटरिंग व्यावसायिकांनी त्यांचा हा पैसा बीड,लातूर,नांदेड सह इतर ठिकाणी देखील फिरवला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आयकर विभागाच्या औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. याचा प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदार आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली.

आयकर विभागाला या कारवाईत सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.

जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. आयकर विभागाने या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click