December 10, 2022

लक्ष्य सेनने केली सुवर्ण कमाई !

लक्ष्य सेनने केली सुवर्ण कमाई !

नवी दिल्ली- पीव्ही सिंधू पाठोपाठ भारताचा युवा बॅडमिंटन पटू लक्ष्य सेन याने सुवर्णपदक प्राप्त केले आहे.इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा 20 वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.तर किदंबी श्रीकांत याने याच क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे.

लक्ष्य सेनने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला मात देत विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत19-21, 21-9, 21-16 च्या फरकाने सामना जिंकला आहे. याच स्पर्धेत किदंबी श्रीकांत ने रौप्यपदक पटकावले आहे.कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 20 वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 57 पदकं जिंकली आहेत. ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे.

भारतीय खेळाडूंनी यावर्षी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पदकांची लयलूट केल्याचे दिसून येत आहे.पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.विशेष म्हणजे भारताने कांस्य पदक आणि सुवर्णपदक जवळपास सारखेच जिंकले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click