नवी दिल्ली- रविवारी भारतीय कुस्तीपटूंनी सुवर्ण कामगिरी केल्यानंतर सोमवारी बॅडमिंटन मध्ये पी व्ही सिंधू ने सुवर्णपदक मिळवले.ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळणाऱ्या सिंधूच्या या यशाने भारताच्या खात्यात 19 सुवर्णपदक जमा झाले आहेत.
भारताची ऑलिम्पिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं राष्ट्रकुल स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूनं आज कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली
सिंधून हा सामना 21-15, 21-13 असा दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूनं मिळवलेलं हे पहिलच सुवर्णपदक तर एकूण तिसरं पदक ठरलं. याआधी तिनं 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य तर 2014 साली ग्लासगोमध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यानं सिंधूनं मिळवलेल्या सोनेरी यशामुळे भारताच्या खात्यात यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आता एकूण 19 सुवर्णपदकं जमा झाली आहेत