नवी दिल्ली- 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ( CWG 2022 ) दहाव्या दिवशी रविवारी भारताला बॉक्सिंगमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक मिळाले.भारतासाठी रविवार सुवर्ण वार ठरला.बॉक्सिंग मध्ये सलग दोन सुवर्णपदक प्राप्त करत भारतीय खेळाडूंनी अभिमानाने तिरंगा झेंडा फडकवला.
बॉक्सिंगमध्ये नीतूने महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 14 वे सुवर्णपदक आहे.
नीतू घनघासनंतर अमित पंघलने 51 किलो वजनी गटात इंग्लंडच्या मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले ( Boxer Amit Panghal won gold medal ). त्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाच्या खात्यात 15 सुवर्ण पदकांची भर पडलेली आहे.