February 8, 2023

वेटलिफ्टिंग मध्ये भारताचा पंच ! आणखी एक सुवर्णपदक !!

वेटलिफ्टिंग मध्ये भारताचा पंच ! आणखी एक सुवर्णपदक !!

नवी दिल्ली- बर्मिंगम हॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने दुसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.मीराबाई चानू नंतर जेरेमी लालरिनुंगानं याने वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक पटकावले.भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच पदक मिळवली असून ही सगळी वेटलिफ्टिंग मध्येच मिळवली आहेत.

पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं. या स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण पाच पदकं जिंकली आहेत. भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत.

वेटलिफ्टिंगच्या 67 वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या जेरेमीनं स्नॅच इव्हेंटमध्ये 140 किलो वजन उचलून नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलून एकूण 300 किलो ग्रॅम वजन उचललं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. या स्पर्धेतील अखेरच्या प्रयत्नात जेरेमीला अपयश आलं. मात्र, तरीही त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला.

जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील त्याचं पहिलचं वर्ष आहे. याआधी 2018 मध्ये त्यानं युवा ऑलम्पिक स्पर्धेतील 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एवढेच नव्हेतर, गेल्या वर्षी पार पडलेल्या 67 वजनी गटातही त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं.

कॉमनवेल्थ 2022 मधील शनिवार हा भारतीय संघासाठी समाधानकारक ठरला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारतानं काल एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह पाच पदक जिंकली होती. भारतीय वेटलिफ्टर संकेत सरगरनं रौप्यपदक भारताचं खातं उघडलं. त्यानंतर गुरुराज पुजारीनं कांस्यपदक, मीराबाई चानूनं सुवर्णपदक आणि बिंद्याराणी देवीनं रौप्यपदक मिळवलं. यातच जेरेमी लालरिनुंगानं आज वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची पदकांची संख्या पाचवर नेली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click