February 8, 2023

जिल्हा निवड समितीला डावलून नियुक्ती ! आरोग्य विभागात जवळेकर पॅटर्न !!

जिल्हा निवड समितीला डावलून नियुक्ती ! आरोग्य विभागात जवळेकर पॅटर्न !!

बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरू आहे.जिल्हा निवड समिती अर्थात जिल्हाधिकारी यांना अंधारात ठेवून जिल्हा आरोग्य विभागाने एका उमेदवाराला थेट आरोग्य सेवक पदी नियुक्ती दिली आहे.यामुळेमाजी जिल्हा परिषद सीईओ राजीव जवळेकर यांचा पॅटर्न पुन्हा सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे.

बीड जिल्हा परिषदेत 2014 साली आरोग्य सेवक गट क पदासाठी अपंग कोट्यातून अर्ज मागविण्यात आले होते.यामध्ये निवड यादी प्रसिध्द झाली मात्र प्रकरण न्यायालयात गेले.त्यामुळे ही निवड प्रक्रिया लांबली.न्यायालयाने उमेदवारांच्या बाजूने निकाल दिला.

या विरोधात जिल्हा परिषदेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील नव्याने रुजू झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते आणि त्यांच्या कार्यालयाने सोनवणे नामक एका उमेदवाराला थेट आरोग्य सेवक म्हणून नियुक्ती दिली.

जिल्हा परिषदेने जेव्हा ही प्रकिया सुरू केली त्यावेळी सतीश ताकतोडे,सुभाष सोनवणे,बालाजी सावळकर आणि प्रल्हाद मनवार या चौघांची नावे गुणानुक्रमे जाहीर करण्यात आली.मात्र प्रतीक्षा यादीत जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांना डावलून सुभाष सोनवणे या उमेदवाराला थेट शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राक्षसभुवन उपकेंद्रात नियुक्ती देण्यात आली.

वास्तविक पाहता कोणत्याही भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा निवड समिती नियुक्त केलेली आहे,जिल्हाधिकारी हे याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.या निवड समितीसमोर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बोलावून त्यांची मुलाखत घेऊन नंतर नियुक्ती दिली जाते.मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते,प्रशासन अधिकारी,सहायक प्रशासन अधिकारी आणि इतरांनी संगनमत करून लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेत सोनवणे या उमेदवाराला थेट नियुक्ती देऊन टाकली.

विशेष बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी राज्यात आरोग्य विभागातील भरती घोटाळा अन पेपरफुटी प्रकरण घडले असताना आणि मोठं मोठे अधिकारी यात जेलमध्ये गेलेले असताना डी एच ओ गित्ते अँड कंपनीने थेट नियुक्ती देण्याची हिम्मत केलीच कशी अस सवाल उपस्थित होत आहे.

बीड जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांनी त्यांच्या काळात अशाच पद्धतीने लक्ष्मीदर्शन चा लाभ घेत शिक्षक,कर्मचारी यांची भरती केली होती.त्यांच्या काळातील ही भरती राज्यात वादग्रस्त ठरली होती.अनेकांना त्यानंतर कारवाईला सामोरे जावे लागले होते.त्यानंतर आता पुन्हा एकदा डॉ गित्ते अँड कंपनीने जवळेकर पॅटर्न सुरू केला असल्याचे सोनवणे यांच्या नियुक्ती वरून दिसून येत आहे.

या सगळ्या प्रकरणात जिल्हाधिकारी, जी प सीईओ,अतिरिक्त सीईओ या सर्वांना अंधारात ठेवून डॉ गित्ते व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा गोंधळ घातला आहे.अशाप्रकारे बेकायदेशीर नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अन कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी, सीईओ काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click