July 7, 2022

गोयल,बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी !

गोयल,बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी !

नवी दिल्ली- राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपने आज महाराष्ट्रातून मंत्री पियुष गोयल आणि माजीमंत्री अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.भाजप तिसरा उमेदवार देणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि जगेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे. राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click