February 8, 2023

पंकजा मुंडेंबाबत हायकमांड निर्णय घेईल – फडणवीस !

पंकजा मुंडेंबाबत हायकमांड निर्णय घेईल – फडणवीस !

मुंबई – कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी विधानपरिषद आमदार व्हावं मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल अस सांगून आगामी विधानपरिषद च्या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्याबाबत हायकमांड योग्य निर्णय घेईल,त्या आमच्या सिनियर नेत्या आहेत अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे खरोखरच मुंडे यांना संधी मिळणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना आगामी विधानपरिषद निवडणूक बाबत वक्तव्य केले होते,त्याबाबत मुंबई येथे पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले की,पंकजा मुंडे यांच्याबद्दल नाराजी वगैरे नाही. पंकजा आमच्या सिनियर नेत्या आहेत. ज्यावेळी एखादी निवडणूक येते त्यावेळेस त्यांचं नाव चर्चेत येणं हे साहजिक आहे. त्यामुळे त्यात काही वावगं नाही.

कारण त्या कोणत्याही पदाकरता एलिजिबलच आहेत. त्या संदर्भातील निर्णय हायकमांडला घ्ययाचा आहे. आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा आहे. त्या आणि आमचे हायकमांड दोन्ही मिळून या संदर्भात निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

“मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझी अशी कुणाशी चर्चा नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते. आता हा पायंडा पडलेला आहे.पण माझी अशी कुणाशीही चर्चा झालेली नाही. अनेक नावं येत आहेत. माझ्या एकटीचं नाव पुढे येत नाहीय. अनेक जागा आहेत.पक्ष जो निर्णय घेईल ते निर्णय झाल्यावरच कळेल”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे.अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click