February 8, 2023

अयोध्या दौरा ते औरंगजेबाची कबर,सगळ्या मुद्यावर राज यांनी घेतला खरपूस समाचार !

अयोध्या दौरा ते औरंगजेबाची कबर,सगळ्या मुद्यावर राज यांनी घेतला खरपूस समाचार !

पुणे – अयोध्या दौरा असो की संभाजीनगर च नामांतर अथवा भोंग्याचा विषय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढविला. शिवसेनेने औरंगाबाद मध्ये एमआयएम ला वाढवले असा आरोप करीत हिंमत असेल तर नामांतर करून दाखवा असे आव्हान दिले.

राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करताच ते म्हणाले की, आपल्या सभांना हॉल पुरत नाही. मात्र एस.पी. कॉलेजचे लोक सभेसाठी जागा देण्यास तयार नव्हते. मग त्यांनी आता यानंतर कुणालाच द्यायचा नाही. नदीपात्रातला विषय सुरु होता. मात्र पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे तिथे सभा कशाला असं म्हणत निवडणुका नसताना उगाच कशाला पावसात भिजायचं असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांचं नाव न घेता टोला लगावला.

अयोध्या दौरा रद्द केल्यापासून चर्चा सुरु होती ती, त्यामागच्या कारणाची. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की, 1 तारखेला माझ्या पायाच्या त्रासासंदर्भात हीप बोनवर शस्त्रक्रिया होणार आहे. मी दोन ओळीत अयोध्या दौरा स्थगित झाल्याचं सांगितलं. मी जाणीवपूर्वक बफर झोन दिला, जेणेकरून काय बोलयाचं त्यांनी ते बोलावं. मात्र याबद्दल माझी भूमिका स्पष्ट आहे.

राज ठाकरे म्हणाले, आपण सांगितलं होतं ज्या मशिदीवरील भोंगे उतरणार नाही, आवाज कमी करणार नाही, त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाचा. तर राणा दाम्पत्य मातोश्रीवर गेले. मातोश्री काय मशिद आहे का असं म्हणत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्यांवर देखील निशाणा साधला. तसंच ते पुढे म्हणाले, राणा दाम्पत्य आणि संजय राऊत नंतर सोबत जेवताना दिसले, याबद्दल शिवसैनिकांना काहीच वाटत नाही का? यांचं हिंदुत्व केवळ पक-पक करण्यापूरत मर्यादित आहे असं राज ठाकरे म्हणाले.

आमचं हिंदुत्व खरं की खोटं सुरु आहे. हे काय वॉशिंग पॉवडर विकतायेत का? असा मिश्किल सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. तसंच आमच्या हिंदुत्वाचा इफेक्ट लोकांना दिसतो असं राज ठाकरे म्हणाले. इथे मुंबईत पाकिस्तानी कलाकार येत होते, तेव्हा आम्ही त्यांना हाकललं. रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर अत्याचार केला, त्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. उद्धव ठाकरेंनी मला फक्त सांगावं की, त्यांच्यावर एक तरी आंदोलनाची केस आहे. महाविकास आघाडी सरकार पाहिलं तर बाळासाहेबांना आनंद होईल असं शिवसेना नेते म्हणत आहेत. शरद पवार म्हणतात आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी सोबत जेवायचो. शिवसेना या सर्व गोष्टींमुळे क्रेडीबीलीटी घालवते आहे असं राज ठाकरे म्हणाले.

नरेंद्र मोदींनी संभाजीनगर नाव करुन शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा संपवून टाकावा. शिवसेनेने औरंगाबादेत एमआयएमला वाढवलं. यांना कळालंही नाही की आपण राक्षस वाढवतोय. यांच्यामुळे त्यांचा खासदार आला, त्यामुळे लोक आता औरंगजेबाच्या कबरीवर लोक डोकं टेकवण्याची हिंमत करत आहेत. शरद पवार तर म्हणतील औरंगजेब सुफी संत आहे. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यावर महाराष्ट्र खवळेल असं वाटलं होतं, मात्र सगळे शातं आहेत. अफजल खानाच्या कबरीचा विस्तार आता, 15 ते 20 हजार फुटात झाला आहे. तिथे मशिद उभी राहिली असून, त्याला निधी दिला जातोय. मात्र हे सर्व सुरु असताना आम्ही षंढ आहोत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click